
बेड मैट्रेस टेस्टर - हे काम करणाऱ्या व्यक्तीला दररोज 6 ते 7 तास अंथरुणावर झोपावे लागेल. बेडवर झोपणे आणि त्याचा आढावा घेणे असा कामाचा भाग आहे.

स्लीप रिसर्च सब्जेक्ट - जगभरात अनेक रुग्णालये, दवाखाने, विद्यापीठे आणि संशोधन केंद्रे आहेत जी क्लिनिकल चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांना नोकऱ्या देतात. सहभागींना पलंगावर झोपण्यासाठी पगार दिला जातो. एका अहवालानुसार, कंपन्या या कामासाठी $100 ते $3000 म्हणजेच 7500 ते 2.5 लाख रुपये देतात.

प्रातिनिधिक फोटो

एनवायरमेंट स्टडी टेस्टर ही जॉब पोस्ट अभ्यासासाठी सुरू करण्यात आले होते ज्याचा उद्देश वेगवेगळ्या वातावरणाचा झोपेवर कसा परिणाम होतो हे शोधणे हा होता. त्यासाठी महिन्याला सरासरी दीड लाखांपर्यंत वेतन दिले जात होते.

स्लीप टेस्टर हा जगातील सर्वात आरामदायक जॅब आहे असे शकतो. एका अहवालानुसार, चिनी फर्म नाओ बायजिनने अर्जदारांना व्यावसायिक स्लीपर बनण्यासाठी दरवर्षी 15 लाख रुपयांची ऑफर दिली होती.