फिरायचं तर परदेशातच जा ना! ‘या’ देशात व्हिसा फ्री एंट्री; पर्यटाकांचा ओघ वाढला

भारतीय पर्यटक व्हिसाशिवाय 60 दिवस थायलंडमध्ये राहू शकतात आणि हा कालावधी 30 दिवसांनी वाढवता येतो. थायलंडमधील सुंदर किनारे, ऐतिहासिक मंदिरे आणि समृद्ध संस्कृती भारतीय पर्यटकांना आकर्षित करतात.

फिरायचं तर परदेशातच जा ना! 'या' देशात व्हिसा फ्री एंट्री; पर्यटाकांचा ओघ वाढला
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 11:45 AM

फ्री व्हिसा एंट्री लागू झाल्यापासून थायलंड हा भारतीय पर्यटकांचा आवडता ठिकाण बनला होता. यामुळे अनेक भारतीय पर्यटकांनी थायलंडचा दौरा केला. पण आता फ्री व्हिसा प्रवेशाच्या कालावधीचा समारोप होण्याच्या मार्गावर असतानाच थायलंडकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय पर्यटकांसाठी दिलेला फ्री व्हिसा प्रवेश अनिश्चित कालावधीसाठी वाढवण्याचा निर्णय थायलंडने घेतला आहे. थायलंडच्या पर्यटन प्राधिकरणाने भारतासाठी व्हिसा-रहित प्रवेश वाढवण्याची घोषणा केली आहे.

पूर्वी 11 नोव्हेंबरपर्यंत भारतीय नागरिकांसाठी थायलंडमध्ये फ्री व्हिसा प्रवेश दिला होता. परंतु, कालावधी संपण्यास काहीच दिवस शिल्लक असतानाच या निर्णयात वाढ करण्यात आली आहे. पुढील सूचना येईपर्यंत हा फ्रि व्हिसा एन्ट्री सुरूच राहणार आहे. नोव्हेंबर 2023मध्ये थायलंडने भारतीय नागरिकांसाठी फ्री व्हिसा प्रवेश सुरू केला होता. भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय 60 दिवसांपर्यंत थायलंडमध्ये राहता येईल, आणि हा कालावधी 30 दिवसांनी वाढवण्याची सोय देखील उपलब्ध आहे. कालावधी वाढवण्यासाठी इमिग्रेशन ऑफिसशी संपर्क साधावा लागेल. जानेवारी ते ऑक्टोबर 2023 दरम्यान थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या 16.17 मिलियनपर्यंत पोहोचली ualrहे. भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी थायलंड सरकार अनेक सवलती जाहीर करत असते.

काय पाहाल?

थायलंड हा जगातील सर्वोत्तम बीच डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. इथे चमचमणारे वाळूचे किनारे, उंचच उंच पाम वृक्ष, तेजस्वी निळा समुद्र, जलक्रीडांचा आनंद या सर्व गोष्टी थायलंडला जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवतात. थायलंडचा सांस्कृतिक वारसा, निसर्ग, साहसी क्रीडा यांचा संयोग पर्यटकांना एक अद्वितीय अनुभव देतो. बँकॉकमधील ग्रँड पॅलेस, बुद्ध मंदिर अशी ऐतिहासिक मंदिरे प्रसिद्ध आहेत.

आणखी काय पाहाल?

तसेच शांतीदायक मंदिरे आणि ट्रेकिंगसाठी उपयुक्त पर्वतीय प्रदेश असलेल्या चियांग माई शहराचाही थायलंडमध्ये समावेश आहे. बँकॉकच्या जवळ असलेल्या प्रसिद्ध फ्लोटिंग मार्केट्समध्ये खरेदी करण्याची संधी नक्कीच गमावता कामा नये. थायलंडचे समृद्ध खाद्यसंस्कृती, मैत्रीपूर्ण लोक, आणि अत्यंत परवडणारी किमती यामुळे हा देश एक अविस्मरणीय पर्यटन स्थळ बनवला आहे. बीच असो किंवा मंदिरे, शहर असो किंवा पर्वत, थायलंड प्रत्येक प्रकारच्या प्रवाशांना एक साहस देणारा ठिकाण आहे.

सैफचा जीव वाचवणाऱ्या 'रियल लाइफ हिरो'ला मुंबईकरांचा असा सॅल्यूट
सैफचा जीव वाचवणाऱ्या 'रियल लाइफ हिरो'ला मुंबईकरांचा असा सॅल्यूट.
23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होणार,शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा
23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होणार,शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा.
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल.
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार.
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं.
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'.
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.