AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sleep : झोप पूर्ण झाल्यानंतरही आळस येत असेल, तर शरीराच्या ‘ या ‘ भागाला करा मालिश !

जर तुम्हालाही झोप पूर्ण झाल्यावरही नेहमी अंगात आळस येत असेल, तर याचा अर्थ हा की तुमच्या शरीरात अशी एखादी समस्या आहे, ज्यामुळे तुम्हाला थकवा येत आहे.

Sleep : झोप पूर्ण झाल्यानंतरही आळस येत असेल, तर शरीराच्या ' या ' भागाला करा मालिश !
| Updated on: Sep 01, 2022 | 4:58 PM
Share

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत (busy lifestyle) बऱ्याच वेळेस असं होतं की आपली झोप पूर्ण होत नाही. कामाचे तास आणि ताण वाढल्यामुळे उशीरा झोपावे लागते व सकाळी लवकर उठून परत काम सुरू करावे लागते. त्यामुळे बऱ्याच जणांची झोप (enough sleep is important) पूर्ण होत नाही. मात्र काही वेळेस अशी परिस्थिती असते की पुरेशी झोप घेतल्यानंतरही अंगात आळस भरल्यासारखा वाटतो. जर तुम्हालाही झोप पूर्ण झाल्यावरही नेहमी अंगात आळस (laziness) येत असेल, तर याचा अर्थ हा की तुमच्या शरीरात अशी एखादी समस्या आहे, ज्यामुळे तुम्हाला थकवा येत आहे. काही उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. येथे आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक उपाय सांगू इच्छितो, ज्याचा वापर केल्याने तुम्हाला उत्साहित वाटेल. काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया.

शरीरातील आळस असा पळवून लावा – – आयुर्वेदानुसार तुम्ही रोज 20 ते 25 शरीराला तेलाने मालिश केले पाहिजे. यामुळे शरीराला खूप आराम मिळतो आणि मेंदूही ॲक्टिव्ह मोडमध्ये येतो.

– तसेच तुम्ही रोज सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे. सकाळी लवकर उठल्याने शरीराला ताजी हवा मिळते. त्यामुळे मेंदूही उत्साहित राहतो. तसेच मेंदू ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी योगासने आणि प्राणायाम करावा.

– सकाळी उठल्यावर मडिटेशन करणे हेही खूप चांगलं आणि फायदेशीर असते. त्यामुळे संपूर्ण शरीर ॲक्टिव्ह होते. रक्ताभिसरण चांगले होते. तसेच तुमची एकाग्रताही वाढते. त्याशिवाय तुमचा रोजचा आहारही चांगला, पौष्टिक ठेवला पाहिजे. पचन चांगले व्हावे यासाठी ताजे, गरम अन्न खावे.

– जास्त वेळ झोपल्यमुळेही शरीरात आळस साठून राहतो. तसेच रात्री उशीरा जेवल्यामुळे आणि उशीरापर्यंत जागे राहिल्यामुळेही शरीरातील उर्जा कमी होते. त्यामुळे लवकर जेवून, लवकर झोपावे व सकाळीही लवकर उठावे.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...