
Cooling Face Pack : उन्हाळा असो वा पावसाळा, त्वचेची काळजी (skin care) घेणे महत्वाचेच असते. मात्र उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे त्वचा (sun damage to skin) खराब होण्याचा धोका असतो. याशिवाय जास्त घाम आल्याने त्वचा कोरडी (dry skin) पडू लागते. त्वचेची कोणतीही हानी होऊ नये यासाठी त्वचेला हायड्रेट करणे आवश्यक आहे.
तुम्ही त्वचेसाठी कूलिंग फेस पॅक वापरू शकता. याच्या मदतीने तुम्ही तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने हील (heal) करू शकता. कोणत्या कूलिंग फेस पॅकच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता ते जाणून घेऊया.
काकडी व कोरफडीची कमाल
हा फेसपॅक बनवण्यासाठी काकडीचा रस काढून घ्यावा. काकडीचा थोडा रस 2 चमचे कोरफडीच्या जेलमध्ये मिसळा. आता हे मिश्रण नीट एकत्र करून 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि मुलायम राहील.
मिंट आणि दह्याचा फेसपॅक
पुदिन्याची पाने व्यवस्थित चुरून घ्या आणि त्याचा रस काढा. यानंतर दोन चमचे दह्यात पुदिन्याचा रस घाला. हे नीट मिसळा आणि हा पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. पुदिना त्वचेला थंड ठेवतो आणि दही त्वचेला मॉयश्चरायझ करते.
टरबूज आणि मधाचा फेस पॅक
टरबूज चांगले मॅश करीन एकजीव करून घ्या. या लगद्यामध्ये एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण सुमारे 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
गुलाबपाणी आणि मुलतानी माती
एक चमचा मुलतानी मातीमध्ये दोन चमचे गुलाबजल मिसळा. दोन्ही चांगले एकत्र करा. हे मिश्रण कमीतकमी 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. मुलतानी माती त्वचेवरील सर्व धूळ आणि घाण काढून टाकते. तर गुलाब पाण्याने त्वचा थंड राहते.