चमकदार त्वचा हवीये? मग, ‘हे’ घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा !

| Updated on: May 15, 2021 | 5:27 PM

त्वचेला चमकदार आणि सुंदर बनविण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास फेसपॅक सांगणार आहोत.

चमकदार त्वचा हवीये? मग, हे घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा !
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : त्वचेला चमकदार आणि सुंदर बनविण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास फेसपॅक सांगणार आहोत. संत्री हे फळ व्हिटॅमिन सीचा मोठा स्त्रोत आहे. संत्र्याच्या सालमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे तुमची त्वचा सुधारण्यास मदत करतात. संत्र्याच्या सालमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे तुमची त्वचा सुधारण्यास मदत करतात. Try these five face packs for glowing skin

फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा संत्र्याच्या पावडर घ्या त्यामध्ये दही व्यवस्थितपणे मिक्स करा. ही पेस्ट साधारण 20 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा धुवा हि प्रक्रिया आठवड्यातून दोन वेळा केली तर तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. त्वचा तेलकट असल्यास एका वाटीमध्ये संत्र्याच्या सालींची पेस्ट आणि चंदन पावडर एकत्र घ्या व फेस पॅक तयार करा. या पॅकमुळे तेलकट त्वचेवरील मुरुमांची समस्या हळूहळू दूर होण्यास मदत मिळू शकते.

तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या उपचारांसाठीही वापरले जातात. तांदळाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा तांदळाचे जाडसर पीठ आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर स्क्रबप्रमाणे लावा आणि काही वेळाने धुवून टाका.

ऑलिव ऑईल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. रोज झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईलचा वापर करून आपण सुरकुत्यापासून मुक्त होऊ शकता. दररोज झोपायच्या आधी आपल्या हातांना देखील ऑलिव्ह ऑईलने मालिश करा. तेल लावून झाल्यावर हातात सूती ग्लोव्ह्ज घाला आणि रात्रभर छान झोप घ्या. सकाळी उठून कोमट पाण्याने आपले हात आणि चेहरा धुवा.

दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सर्नबर्न आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. सन बर्न कमी करण्यासाठी त्वचेवर दही लावा आणि 15 मिनिटांनंतर त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. टॅनिंग काढून टाकण्यासाठी दह्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन पीठ आणि लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि कोरडे होऊ द्या. मिश्रण चांगले कोरडे झाल्यावर त्वचा पाण्याने धुवा. आपल्याला काही दिवसांतच याचा फरक दिसून येईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Try these five face packs for glowing skin)