Diwali Skin Care: स्किन डल झालीये? दिवाळीपूर्वी चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी ट्राय करा हा घरगुती फेस पॅक
दिवाळीची साफसफाई, तयारी करताना त्वचेची हवी तशी काळजी घेता येत नाही. यामुळे चेहऱ्यावर डलनेस दिसतो. हा डलनेस दूर करून नैसर्गिक चमक हवी असेल तर तुम्ही हा घरगुती फेस पॅक वापरू शकता.

दिवाळीत महिलांचा बराच वेळ साफ सफाई आणि इतर तयारी करण्यात जातो. त्यांच्या त्वचेवर धूळ आणि घाण जमा होऊ लागते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. तुमची त्वचा सुद्धा डल दिसत असेल आणि तुम्हाला दिवाळीपूर्वी चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा असेल तर तुम्ही घरच्या घरी हा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता. त्वचेला चमक देण्यासोबतच ओलावाही मिळेल. ज्यामुळे कोरडेपणा दूर होईल आणि चेहरा गुलाबासारखा टवटवीत दिसेल. यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यायची गरज नाही. तर घरात सहज उपलब्ध असणाऱ्या तीन गोष्टी वापरून हा फेस पॅक बनवायचा आहे. पाहा कोणता आहे हा खास फेस पॅक.
घरगुती फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला हे साहित्य आवश्यक आहे
१ चमचा मसूर डाळ
४ चमचे कच्चे दूध
२ काड्या केशर
असे बनवा फेस पॅक
हे फेस पॅक बनवण्यासाठी मसूर डाळ रात्रभर कच्च्या दुधात भिजत ठेवा. यात २-३ केशर टाकून भिजवा. सकाळी या दुधात भिजवलेली डाळ बारीक करून घ्या. पेस्ट चांगली बारीक झाली आहे याची खात्री करा. तसेच भिजवलेले केशरच्या काड्या सुद्धा चांगले मिक्स करा. जेणेकरून केशराचा एक सुंदर रंग मिळेल. आता हा फेस पॅक चेहरा आणि मानेला लावा. साधारण अर्ध्या तासानंतर हलक्या हाताने मसाज करून काढून टाका.
चेहऱ्यावर येईल अप्रतिम चमक
जर तुम्ही हा फेस पॅक दिवाळीच्या काही दिवस आधी वापरला तर इतर कोणत्याही प्रकारच्या फेस पॅकची गरज भासणार नाही. तसेच त्वचेवर कमालीचा ग्लो येईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा फेस पॅक बनवून फ्रिजमध्ये ३-४ दिवस ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला फक्त वेळ काढून हा पॅक चेहऱ्यावर लावावा लागेल.
त्वचेसाठी फायदेशीर आहे मसूर डाळी
मसूर डाळीचा फेस पॅक लावल्याने त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होते आणि डेड स्किन लवकर निघून जाते. तसेच हा फेस पॅक सतत वापरल्यास चेहऱ्यावर दिसणारे उघडे आणि मोठे छिद्र कमी होण्यासही मदत होते. मात्र, मसूर डाळीचा फेस पॅक आठवड्यातून तीन दिवसांपेक्षा जास्त लावू नये.