AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yoga Tips: दिवसभर खुर्चीवर बसून काम केल्याने वाढतंय वजन? दररोज फक्त 10 मिनिटं करा ही 4 योगासनं

Yoga for Weight Loss: हल्ली बहुतांश लोक दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करतात. तासनतास एकाच जागी बसून काम केल्यामुळे वजन वाढणे, पाठदुखी आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी काही सोपी योगासने केल्यास शरीर सक्रिय आणि निरोगी ठेवण्यास मदत होते.

Yoga Tips: दिवसभर खुर्चीवर बसून काम केल्याने वाढतंय वजन? दररोज फक्त 10 मिनिटं करा ही 4 योगासनं
yoga tips Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 03, 2026 | 11:45 AM
Share

दिवसभर ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून राहिल्यामुळे नकळत अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ लागतात. वजन वाढणे, पोट सुटणे, कंबर आणि खांदेदुखी यांसारख्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः लॅपटॉपसमोर तासनतास काम करणाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी रोजच्या व्यस्त दिनक्रमातून थोडा वेळ काढून शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. तुम्ही कामातून अवघी १० मिनिटे काढून काही सोप्या योगासनांचा सराव करू शकता. ही योगासने शरीर सक्रिय ठेवण्यास, लवचिकता टिकवण्यास आणि स्नायूंना आराम देण्यास मदत करू शकतात.

वज्रासन हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम गुडघे वाकवून पायावर बसावे. अशा प्रकारे बसताना लक्षात ठेवा की आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये थोडे अंतर आहे आणि आपल्या कमरेवरील भाग एकदम सरळ आहे. आता आपले दोन्ही हात मांडीवर ठेवा आणि शरीराचे संपूर्ण वजन पायावर ठेवून मनाला आराम द्या. हे आसन नियमित केल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.

ताडासन सतत एकाच स्थितीत काम केल्याने मणक्याची हाडे दुखू लागतात. अशावेळी मणक्याची हाडे मजबूत करण्यासाठी आणि पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ताडासन खूप फायदेशीर ठरू शकते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सावधान स्थितीत उभे रहा. यानंतर हात वरच्या बाजूला नेऊन दोन्ही हातांची बोटे एकत्र जोडावीत. आता पायाची टाच उंचावताना बोटांवर उभे राहा. थोडा वेळ या स्थितीत राहा आणि नंतर रिलॅक्स मोडवर परत या.

पद्मासन बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी आणि पाठदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी पद्मासन करावे. हे आसन केल्याने एकाग्रताही वाढते आणि पोटही निरोगी राहते. ते करण्यासाठी आधी मांडी मारून बसा. आता आपला उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आता आपल्या दोन्ही हातांचे तर्जनी बोट अंगठ्याच्या मधल्या रेषेवर ठेवा आणि हात गुडघ्यावर ठेवा. आता डोळे मिटून ५ ते १० मिनिटे पूर्णपणे शांत बसा.

दंडासन हे आसन केल्याने मणक्याची हाडेही ताणली जातात आणि पचनसंस्था मजबूत होते. दंडासन करण्यासाठी सर्वप्रथम बसा आणि आपले दोन्ही पाय सरळ समोर पसरवा. आता आपले दोन्ही हात नितंब शेजारी जमिनीवर ठेवा. हे आसन करताना पाठ, डोके आणि मान सरळ ठेवा. यानंतर पायाची बोटे आपल्याकडे खेचून घ्या. हे आसन केल्याने तुमचे शरीर ताणले जाईल. ज्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतील.

Follow Us
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी....
Tusshar Kapoor : तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा
गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून
Mahayuti : गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून महायुतीत नाराजीचा सूर
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी
NCP : निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या...; पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी
सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष
अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील....
District Bank Election Result 2026 : अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील पराभूत
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी....
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी, कोण मारणार बाजी?
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना....
Satara District Bank Election Result : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना धक्का; कार्यकर्त्यांचा जल्लोष
हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार....
Pradeep Purnekar : Ram Purnekar : हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार; कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येणार?
सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार...
Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार... मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा