सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा उलटफेर; फलटणमध्ये भाजपला जबर धक्का, नेमकं काय घडलं?
Satara district bank election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. साताऱ्यातील फलटणमध्ये भाजपला जबर धक्का बसला. नेमकं काय घडलं, जाणून घ्या

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढाई झाली. साताऱ्यामधील लढतीत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी मारली. या निवडणुकीत शंभूराज देसाई यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. फलटणमध्ये भाजपला जबर धक्का बसला. साताऱ्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाई यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव झालाय. तर भाजपच्या समशेरसिंग नाईक निबांळकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदान मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली. या निवडणुकीत 21 जागांपैकी 12 जागांवर लढत झाली. यामध्ये माण तालुक्यात मंत्री जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे, फलटण तालुक्यात संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर अशी प्रमुख लढत पाहायला मिळाली. या लढतीत शिंदे गटाचे शंभुराज देसाई यांची गेमचेंजर खेळी प्रभावी ठरली. साताऱ्यातील बँकेच्या निवडणुकीत फलटणमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. फलटणमध्ये शिंदे गटाचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांना 71 मते मिळाली. तर समशेरसिंग नाईक निंबाळकर यांना 60 मते मिळाली. त्यामुळे समशेरसिंग निंबाळकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
कोणत्या सोसायटी मतदारसंघात कोणी मारली बाजी?
जावळी सोसायटी मतदारसंघ
१) विठ्ठल गोळे ८ मते राष्ट्रवादी
२) ज्ञानेश्वर रांजणे ३८ मते विजयी भाजप
खंडाळा सोसायटी मतदारसंघ
१) अजय भोसले राष्ट्रवादी २८ मते
२) संजीव गाढवे भाजप २१ मते
३) शामराव गाढवे अपक्ष शून्य मते
महाबळेश्वर सोसायटी मतदार संघ
१) रुपाली राजपुरे राष्ट्रवादी ८ मते विजयी
२) संजय मोरे शिवसेना ४ मते
पाटण सोसायटी मतदारसंघ
१)शंभूराज देसाई शिवसेना ५८ मते विजयी
२) सत्यजीत पाटणकर भाजप ४६ मते
माण सोसायटी मतदारसंघ
१) जयकुमार गोरे भाजप ५३ मते
२) मनोज पोळ राष्ट्रवादी १४ मते
३) शेखर गोरे शिवसेना ७ मते
