AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा राष्ट्रवादी अनाथ, भविष्यात अमित शाह राष्ट्रवादी आणि शिंदेसेना संपवणार; बड्या नेत्याचा मोठा दावा

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे की अमित शाह यांनीच राष्ट्रवादी आणि शिंदेसेना हे पक्ष स्थापन केले. भविष्यात शाह दोन्ही पक्षांना संपवून भाजपमध्ये विलीन करतील. अजितदादांचा राष्ट्रवादी अनाथ झाला असून, राष्ट्रवादीला आणि शिंदे सेनेला अमित शाहांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. हे पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावत आहेत, असे राऊत म्हणाले.

अजितदादांचा राष्ट्रवादी अनाथ, भविष्यात अमित शाह राष्ट्रवादी आणि शिंदेसेना संपवणार; बड्या नेत्याचा मोठा दावा
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 11:57 AM
Share

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना हे दोन्ही पक्ष अमित शाह यांनीच स्थापन केले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना पक्षातील कुरबुरी मिटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे जावं लागतं. अमित शाहांनी निर्माण केलेले हे गट आहेत. त्यामुळे या लोकांना अमित शाहांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही, असं सांगतानाच भविष्यात अमित शाह शिंदे सेना आणि राष्ट्रवादी सपूर्णपणे नष्ट करणार, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावरून संजय राऊत यांनी घणाघाती हल्ला चढवला. पक्षात काही समस्या निर्माण झाली की राष्ट्रवादीवाले अमित शाहांकडे जातात. अरे शरद पवारांनी मराठी माणसांसाठी स्थापन केलेला पक्ष आहे. आणि तुम्ही दिल्लीच्या व्यापाऱ्यापाशी जाऊन बसता? इथे शिवसेना नाव घेता आणि चर्चेला अमित शाहांकडे जाता? अरे बाळसााहेबांनी नाव दिलेली ही शिवसेना आहे. अर्थात ती शिवसेना यांची नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं थडगं अमित शाहांनी बांधलं आहे. या लोकांना लाज वाटली पाहिजे. पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचं नाव तुम्हाला जबदरस्तीने दिलं आहे. तुम्ही पक्ष चालवू शकत नाही. तुमची ऐपत नाही. तुमचा खांदा मजबूत नाही. तेवढा तुमचा कणा ताठ नाही. तुम्हाला पाठ नाही. फक्त गुडघे आहेत. तुम्ही गुडघ्यावरच उभे राहता. हे योग्य नाही. मी काल फोटो पाहिला. या लोकांनी महाराष्ट्राची बेअब्रू घालवली आहे. एकनाथ शिंदेंचं ही तसंच आहे. लवकरच हे पक्ष जातील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

अजितदादांचा पक्ष अनाथ

अजितदादांच्या दुर्देवी मृत्यूनंतर हा पक्ष अनाथ झाला. मूळ पक्ष शरद पवारांचाच आहे. हा पक्ष शरद पवारांचा आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे. अमित शाहांची नाही. अजिबात नाही. त्यामुळे हे सर्व अनाथ आहेत. देशातील राजकारण बदलत जाईल तेव्हा यांच्याकडे भाजपमध्ये विलिन होण्याशिवाय मार्गच राहणार नाही. राष्ट्रवादी तर उरलाच नाही. त्यांचे आमदार आणि खासदार भाजपकडूनच आदेश घेऊन काम करतात. गोकुळच्या निवडणुकीत काय झालं? हसन मुश्रीफ या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार काम करत होते. भाजप दोन्ही पक्षात कोंबड्या झुंजवत आहे, असं राऊत म्हणाले.

ही नौटंकी आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम्ही एसआयआरवर चर्चा करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यावरही राऊत यांनी टीका केली. आम्ही चर्चा मागतच नाही. ज्ञानेश कुमारचा राजीनामा मागत आहोत. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग मागत आहोत. देशाचे गृहमंत्री काल तेलंगणात लोकशाही वाचवण्यासाठी पदयात्रा करत होते. एखाद्या खुन्याने सत्यमेव जयतेचा जप करावा तसं हे आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात तुम्ही लोकशाहीची हत्या केली. तिथे पदयात्रा करा ना? दिवा विझताना मोठा होतो. तशी ही नौटंकी आहे, अशी टीका त्यांनी केली.

Follow Us
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी....
Tusshar Kapoor : तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा
गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून
Mahayuti : गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून महायुतीत नाराजीचा सूर
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी
NCP : निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या...; पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी
सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष
अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील....
District Bank Election Result 2026 : अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील पराभूत
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी....
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी, कोण मारणार बाजी?
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना....
Satara District Bank Election Result : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना धक्का; कार्यकर्त्यांचा जल्लोष
हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार....
Pradeep Purnekar : Ram Purnekar : हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार; कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येणार?
सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार...
Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार... मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा