Dipali Sayyed: ‘चाकणकर स्वतःवरच ओढावून…’ ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वर दिपाली सय्यद स्पष्टच म्हणाल्या
Dipali Sayyed: अशोक खरात प्रकरणानंतर 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यावर आता दिपाली सय्यद यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रुपाली चाकणकर यांच्यावर त्यांनी स्पष्ट स्पष्टीकरण दिलं आहे.

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सिनेमाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षक आता सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. भांदूबाबा अशोक खरात याचा खरा चेहरा सर्वांसमोर आल्यानंतर राज्यात खळबळ माजली. अशोक खरातचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. म्हणूनच प्रेक्षक सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे. सिनेमात अशोक खरात याच्या भूमिकेत अभिनेते मनोज जोशी झळकणार आहेत, तर अभिनेत्री दिपाली सय्यद देखील मुख्य भूमिकेत झळकरणार आहेत. दरम्यान, दिपाली सय्यद यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. रुपाली चाकणकर प्रकरणात त्यांनी मोठं वक्तव्य केलं.
सांगायचं झालं तर, दिपाली सय्यद यांना एक प्रश्न विचारण्यात आला. ‘सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालं, तर रुपाली चाकणकर यांना सिनेमा दाखवणार आहात का, त्यांची बदनामी होत आहे? यावर दिपाली सय्यद स्पष्टच म्हणाल्या आहेत की, ‘त्या स्वतःवर ओढावून घेत आहे… आम्ही त्यांच्या नावाचा सिनेमात वापर देखील केलेला नाही..’, सध्या दिपाली सय्यद यांचं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे.
सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सुरु असलेल्या वादावर दिपाली सय्यद स्पष्टच म्हणाल्या, ‘त्यांनी सिनेमा पाहण्यासाठी पुढाकार तर घेतला पाहिजे. तुम्ही ज्याप्रमाणे कोर्टाची भाषा बोलता, त्याचप्रमाणे आम्ही देखील कोर्टाची भाषा बोलतो. तु्म्ही FIR दाखल केली आहे. जर कोर्टात केस सुरु आहे, तेव्हा तुम्ही पोलीस स्थानकात FIR नाही दाखल करु शकत, पण तुम्ही FIR दाखल केली. सर्वातआधी तर तुम्ही या, बोला – बसा, काय वाटत आहे ते सांगा. सिनेमाच्या माध्यमातून श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये काय फरक आहे, हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.
पुढे दिपाली म्हणाल्या, ‘हा सिनेमा म्हणजे कोणाची बायोग्राफी नाही… हे देखील सांगितलं आहे. तुमच्या नावाचा वापर देखील केलेला नाही, हे देखील सांगण्यात आलं होतं. तुम्हीच ठरवत आहात ती माझी व्यक्तीरेखा आहे. तुम्हीत म्हणताय ती मीच आहे… हे तुम्ही स्वतःवर ओढावून घेताय. असं बोलून तुम्हीच सांगताय की, त्या तुम्हीच आहात. असं केलं नसतं तर, कोणी म्हटलंच नसतं, त्या तु्म्ही आहात म्हणून … का करताय असं? असा प्रश्न देखील दिपाली सय्यद यांनी यावेळी उपस्थीत केला.
‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’
‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ या सिनेमात भोंदूबाब अशोक खरातच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी झळकत आहेत. त्याच्यासोबत दिपाली सय्यद, सुबोध भावे, उदय टिकेकर, माधुरी पवार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमातून राजकीय तसेच सामाजिक वर्तुळातील अनेक गुपिते बाहेर येतील असा दावा केला जात आहे. सिनेमा 20 सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
