
गोड पदार्थांची तीव्र इच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच होत असते आणि हे सामान्य आहे. परंतु बदलत्या जीवनशैलीनुसार आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेता आज अनेकजण रिफाइंड साखर किंवा जास्त तुपाचा वापर असलेले गोड पदार्थ खात नाही. अशावेळेस गोड खाण्याची तुमची होत असेल तर ती इच्छा पुर्ण करण्यासाठी शुगर फ्री नारळाचे लाडू हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो.
नारळात भरपूर प्रमाणात फायबर, हेल्दी फॅट आणि खनिजे असतात, जे बराच वेळ आपल्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात आणि पचन सुधारते. नारळाचे लाडू केवळ चविष्टच नाहीत तर आरोग्यदायी आणि बनवायलाही सोपे आहेत. चला तर मग या दोन प्रकारे नारळाचे लाडू कसे बनवायचे याची सोपी रेसिपी आज आपण जाणून घेऊयात.
प्रथम खजूर बारीक चिरून घ्या किंवा फूड प्रोसेसरमध्ये बारीक वाटून पेस्ट बनवा. एका पॅनमध्ये थोडे तूप घाला, खजूर पेस्ट त्यामध्ये टाका आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे परतून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेले काजू किंवा बदाम आणि अर्धे नारळाचा किस टाकून चांगले मिक्स करा आणि मिश्रण थोडे थंड होऊ द्या. आता तयार मिश्रणाचे छोटे लाडुचा आकार देऊन त्यावर नारळाचा बारीक किस टाका. अशापद्धतीने खजूर नारळाचा लाडु तयार आहे.
एका पॅनमध्ये तूप टाका आणि ओल्या नारळाचा किस मधील ओलावा काढून टाकण्यासाठी हलके तळा. त्यानंतर नारळाच्या किसमध्ये दूध टाका आणि मंद आचेवर सतत ढवळत शिजवा. आता मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात दूध पावडर, नारळ साखर आणि वेलची पावडर टाकून मिश्रण पुन्हा चांगले परतवा. आता हे मिश्रण लाडू बनवण्याइतके घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यानंतर गॅस बंद करा, थंड होऊ द्या आणि नंतर लहान लाडू बनवा.
नारळाचे लाडू केवळ गोड पदार्थांची इच्छा पूर्ण करत नाहीत तर आरोग्यासाठीही खूप फायदे देतात. शुगर फ्री पदार्थ खाणाऱ्यांसाठी खजूराचे लाडू परिपूर्ण आहेत, तर नारळाच्या साखरेचे लाडू पारंपारिक चवीसह निरोगी स्पर्श देतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)