
मेकअप म्हणजे फक्त लिपस्टिक किंवा लाइनर लावणे नाही, तर ती एक कला आहे. मेकअप केल्याने आपले सौंदर्य आणखीन खुलून दिसते. अशातच आपण पाहतोच की फॅशनमध्ये जसे सतत नवीन ट्रेंड सेट होत असतात, तसेच मेकअपमध्येही नवीन ट्रेंड येत असतात. एखाद्या ओकेजन नुसार नॅचरल, न्यूट्रल, बोल्ड आणि ड्रामेटिक अशा अनेक मेकअप स्टाइल आहेत. सध्या, मोनोक्रोम मेकअप अधिकाधिक लोकप्रिय होत आहे आणि ज्यांना वाइब्रेट कलर्स आवडत नाहीत व त्यांना एक सटल लूक हवा असतो त्यांच्यासाठी मोनोक्रोम मेकअप बेस्ट आहे.
मोनोक्रोम मेकअप आजकाल खूप लोकप्रिय होत आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच मोनोक्रोम मेकअप लूकचे वेड लागले आहे. तुम्हीही एखाद्या खास प्रसंगासाठी किंवा कामाच्या ठिकाणी मोनोक्रोम मेकअप लूक तयार करू शकता. या लेखात आपण मोनोक्रोम मेकअप लूक म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहेत ते जाणून घेऊयात.
मोनोक्रोम… या शब्दाचा अर्थ “एक रंग” असा होतो. ज्याप्रमाणे फॅशन जगात मोनोक्रोम हा शब्द एकाच रंगाचा किंवा एकाच रंगाच्या वेगवेगळ्या शेड असणे, त्याचप्रमाणे मोनोक्रोम मेकअप अशावेळेस केला जातो जेव्हा चेहऱ्याचे फिचर्स शार्प दिसण्यासाठी हायलाइटरपासून ते आयशॅडो आणि लिप शेडपर्यंतचा मेकअप हा एकाच पॅलेटमध्ये असते, म्हणजेच एकाच रंगाचे शेडचा वापर करून मेकअप करणे.
हा मेकअप लूक वेगवेगळ्या स्किन टोन असलेल्या लोकं सुद्धा करू शकता. कारण यामध्येही तीन प्रकारचे मेकअप लूक होतात, ज्यात वेगवेगळ्या रंगांच्या लाइट आणि डार्क शेड्सचा मेकअप पूर्ण केला जातो. तुमच्या पसंतीनुसार तुम्ही म्यूटेड, ब्राउन-टोनेड मोनोक्रोमॅटिक मेकअप किंवा ऑरेंज-टोनेड मोनोक्रोमॅटिक मेकअप करू शकता. हे चेहऱ्यावरील फिचर्सला हायलाइट करण्यास मदत करते आणि जेव्हा तुमच्या स्किनच्या टोननुसार शेड्स वापरले जातात तेव्हा तुमचे सौंदर्य आणखीन सुंदर दिसते.
मोनोक्रोमॅटिक मेकअप लूक करूया एक्सप्लोर
गुलाबी मोनोक्रोम मेकअप
तुम्हाला जर मोनोक्रोमॅटिक मेकअपमध्ये क्यूट, मजेदार आणि फ्लर्टी टच असलेला लूक तयार करायचा असेल, तर गुलाबी शेड्स बेस्ट आहेत. तुमचा नेहमीचा मेकअप बेस लावा, जसे की फाउंडेशन ब्लेंड करणे आणि कन्सीलर लावणे. तसेच चेहऱ्यावर जिथे अनइव्हन टोनसाठी कलर करेक्टर वापरा. तुमच्या गालांवर गुलाबी ब्लश लावा, परंतु लक्षात ठेवा की ब्लश नॅचरल दिसले पाहिजे. यानंतर गुलाबी शेड्सचा आयशॅडो लावा. तुम्ही येथे गुलाबी रंगाचे दोन शेड्स देखील वापरू शकता, परंतु गडद शेड्स वापरू नका याची काळजी घ्या. तुमच्या ओठांना म्यूट गुलाबी लिपस्टिक लावा.
न्यूड मोनोक्रोम मेकअप लूक हा कोणताही कार्यक्रम असो हा मेकअप बेस्ट आहे. दिवसा आणि रात्री कोणत्याही वेळेत कार्यक्रम असला तरी न्यूड मोनोक्रोम मेकअप केल्याने सौंदर्य खुलून दिसते. डिजायर लूक करायचा असेल तर मोनोक्रोमॅटिक आय मेकअपने सुरुवात करा. प्रथम, बेसिक आयशॅडो पॅलेट घ्या आणि हलक्या तपकिरी मॅट आयशॅडो लावा. स्पार्कचा इशारा देण्यासाठी, तपकिरी-टोन शिमर लावा आणि ते ब्लेंड करा. हा मेकअप लूक पूर्ण करण्यासाठी, फाउंडेशनचा पातळ थर लावा आणि नंतर कन्सीलर लावा, जेणेकरून तुमचा चेहरा हलका दिसेल आणि मेकअप कमीत कमी दिसेल. न्यूड ब्लशने तुमचे गाल हायलाइट करा. ब्राऊन शेडची लिपस्टिक लावून लूक पूर्ण करा.
जर तुम्हाला मिनिमल मेकअप करायला आवडत नसेल तर तुम्ही कोरल मोनोक्रोम मेकअप ट्राय करावा. कोरल रंग हे गुलाबी आणि ऑरेंज शेड्सचे कॉम्बिनेशन आहे. येथे तुम्ही प्रथम एक साधा मेकअप बेस तयार करा, नंतर कोरल रंग वापरून तुमचा डोळ्यांचा मेकअप पूर्ण करा, लिप शेड लावा आणि तुमचा चेहरा कॉन्टूर केल्यानंतर, तुमचे गाल, कपाळ आणि हनुवटी कोरल शेड्सने हायलाइट करा. तुम्ही थोडे अधिक हायलाइटर वापरू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)