AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एचडी मेकअप म्हणजे काय आणि तो नेमका कसा केला जातो? जाणून घ्या

लग्नात योग्य मेकअप निवडणं खूप गरजेचं असतं. तर सध्या ट्रेंडमध्ये आहे तो एचडी मेकअप. एचडी मेकअपमुळे वधूचं सौंदर्य अगदी खुलून दिसतं. मात्र हा एचडी मेकअप असतो तरी कसा आणि तो कसा करतात सर्व माहिती जाणून घ्या.

एचडी मेकअप म्हणजे काय आणि तो नेमका कसा केला जातो? जाणून घ्या
HD Make Up
| Updated on: Nov 28, 2023 | 1:02 AM
Share

लाईफस्टाईल : आता लग्न सराईला सुरुवात झाली आहे, लग्न म्हटलं की मेकअप आलाच. लग्नात प्रत्येक वधूचा मेकअप सर्वांचं लक्ष वेधून घेतो. मेकअप केल्यानंतर वधूचा संपूर्ण लूक बदलून जातो आणि वधू खूप सुंदर दिसते. पण जर चुकून मेकअप बिघडला तर वधूचा लूक डल दिसतो. त्यामुळे लग्नात योग्य मेकअप निवडणं खूप गरजेचं असतं. तर सध्या ट्रेंडमध्ये आहे तो एचडी मेकअप. एचडी मेकअपमुळे वधूचं सौंदर्य अगदी खुलून दिसतं.

एचडी मेकअपध्ये वधूच्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स या गोष्टी तपासून तो मेकअप केला जातो. तसंच एचडी मेकअप केल्यानंतर चेहर्‍यावरील डागही दिसत नाहीत. तसंच हा मेकअप एचडी कॅमेरा लक्षात ठेवून केला जातो. तर आता आपण एचडी मेकअप म्हणजे काय आणि तो कसा केला जातो याबाबत जाणून घेणार आहोत.

एचडी मेकअप म्हणजे हाय डेफिनेशन मेकअप लूक. आजकाल प्रत्येक लग्नसमारंभात एचडी कॅमेऱ्याद्वारे फोटोशूट केले जाते. तर एचडी कॅमेऱ्यामुळे एचडी मेकअप केला जातो जेणेकरून वधूच्या चेहर्‍यावर दिसणारे फ्लॉन्स कॅमेऱ्यात दिसत नाहीत ते मेकअपमुळे लपलेले असतात. त्यामुळे आजकाल सेलिब्रिटीज देखील एचडी मेकअप मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. एचडी मेकअप हा नॅचरल, नॉन-क्रिकी असा लुक देतो. तर हा मेकअप नेहमी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो.

एचडी मेकअप करताना तुमच्या चेहऱ्याला सूट होतील अशी प्रोडक्ट्स निवडावी लागतात. मग एचडी मेकअपसाठी लागणारी प्रोडक्ट्स ही लाईट डिफ्यूझिंग कोटिंग आणि हाय-एंड लेपित असतात. या मेकअपमध्ये प्रीमियम दर्जाची प्रोडक्ट्स वापरली जातात. ही प्रोडक्ट्स तुमच्या चेहर्‍यावरील डाग लपवतात. तसंच मेकअप चेहऱ्यावर लावल्यानंतर तो अजिबात हेवी वाटत नाही. हा मेकअप सामान्य मेकअपप्रमाणेच केला जातो. ब्रश आणि स्पंजने हा मेकअप नीट ब्लैंड केला जातो. तसंच एचडी मेकअप केल्यानंतर चेहर्‍यावर एक नॅचरल ग्लो आल्यासारखं वाटतं.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.