डोंगराळ भागात फिरायला गेल्यावर स्थानिक बाजारातून वस्तू खरेदी करताना ‘या’ चुका अजिबात करू नका

डोंगराळ भागात फिरायला गेल्यावर आपण तेथे असलेल्या स्थानिक बाजारातून वस्तु खरेदी करतो. पण या भागांमध्ये फिरायला गेल्यावर अनेकदा पर्यटकांची फसवणूक होत असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा डोंगराळ भागांमध्ये फिरायला जाता तेव्हा तेथे वस्तू खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी व काय करावे ते आजच्या या लेखात जाणुन घ्या.

डोंगराळ भागात फिरायला गेल्यावर स्थानिक बाजारातून वस्तू खरेदी करताना या चुका अजिबात करू नका
traveling to mountains
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 31, 2025 | 10:26 PM

जेव्हा आपण डोंगराळ भागांमध्ये फिरायला जातो तेव्हा तिथले सौंदर्य, थंड वारा आणि शांत वातावरण आपल्याला खूप आकर्षित करते. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी फिरायला जातो तेव्हा त्या ठिकाणंची एक तेथील स्वतःची खासियत असते, जसे की तिथले पदार्थ, संस्कृती. त्यामुळे तेथील बाजारांमध्ये त्या गोष्टी विकण्यास उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण त्या ठिकाणाची आठवण म्हणून या गोष्टी खरेदी करतात. खरेदी हा प्रवासाचा एक मजेदार भाग आहे. मात्र बऱ्याचदा डोंगराळ ठिकाणांमध्ये खरेदी करताना आपण काही चुका करतो ज्यामुळे आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते किंवा आपलाल्या अनुभव खराब येऊ शकतो.

म्हणूनच आपण हुशारीने वस्तू खरेदी करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत या लेखात तुम्ही जेव्हा फिरायला जाता तेव्हा काही सामान्य चुका करता ज्या खरेदी करताना चुकूनही करू नयेत. तर त्याबद्दल जाणून घेऊया.

एखादी वस्तू आहे त्या किंमतीत खरेदी करणे

डोंगराळ भागातील अनेक दुकाने पर्यटकांना पाहून वस्तूंच्या किमती वाढवतात. जर तुम्ही खरेदी करत असलेल्या वस्तुंच्या किंमतीत भाव न करता एखादी वस्तू खरेदी केली तर तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागू शकतात. कारण तीच वस्तू तेथील स्थानिक लोकं खरेदी करताना नेहमीच मोलभाव करून वस्तू खरेदी करतात, म्हणून तुम्हीही एखादी वस्तू खरेदी करताना योग्य भाव करूनच खरेदी करावी. विशेषतः हस्तकला, ​​लोकरीचे कपडे आणि सजावटीच्या वस्तूंचे भाव हे करण्यासारख्या आहेत. दुकानदार आधी जास्त किंमत सांगतात जेणेकरून तुम्ही कमी किंमतीत वस्तु खरेदी करूनही त्यांना नफा मिळतो. म्हणून, विचारल्याशिवाय किंवा मोलभाव केल्याशिवाय वस्तू खरेदी करू नका.

स्थानिक वस्तुंची गुणवत्ता न तपासता खरेदी करणे

डोंगराळ भागांमध्ये अनेकदा तेथील स्थानिक हस्तकला आणि खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जातात. बऱ्याचदा सुंदर दिसणारी तेथील वस्तू या टिकाऊ नसतात. जर तुम्ही वस्तूंची गुणवत्ता न तपासता खरेदी केली तर त्या लवकर खराब होऊ शकतात. विशेषतः जर तुम्ही लोकरीचे कपडे, जॅकेट किंवा शूज खरेदी करत असाल तर त्याची शिलाई, कापडाची जाडी आणि ब्रँड तपासा. तसेच तेथील प्रसिद्ध अन्नपदार्थ असेल तर त्याचे पॅकेजिंग, तारीख आणि दुकानाची स्वच्छता नक्की तपासा.

जास्त खरेदी करणे

प्रवास करताना आपण बऱ्याचदा गोष्टींनी इतके प्रभावित होतो की आपल्याला गरजेपेक्षा जास्त खरेदी करावी लागते. डोंगराळ भागात फिरणे थोडे कठीण असू शकते आणि जड सामान सोबत घेऊन जाताना अधिक थकवा जाणवतो. तसेच, जास्त सामानासाठी गाड्या किंवा बस हे अतिरिक्त भाडे मागतात.

बनावट ब्रँडेड उत्पादने खरेदी करणे

बऱ्याचदा दुकानदार प्रसिद्ध ब्रँडच्या नावाने स्थानिक उत्पादने विकतात, जी दिसायला सारखी दिसतात पण त्यांची गुणवत्ता खराब असते. जसे की बनावट बूट, बॅग किंवा जॅकेट. डोंगरांमध्ये स्वस्त किमतीत मोठे ब्रँड मिळणे सामान्य नाही. जर कोणी तुम्हाला अर्ध्या किमतीत ब्रँडेड उत्पादन देत असेल तर सावधगिरी बाळगा. बनावट उत्पादने केवळ निकृष्ट दर्जाची नसून ती तुमच्या पैशांचा अपव्यय देखील करू शकतात. पॅकेजिंग, लोगो आणि लेबल्स नेहमी काळजीपूर्वक पहा.

कार्ड किंवा UPI ने कुठेही पैसे भरणे

जरी आजकाल डिजिटल पेमेंट सामान्य झाले असले तरी, डोंगराळ भागात नेटवर्क समस्या असू शकतात किंवा अनेक दुकाने फक्त रोख रक्कम स्वीकारतात. जर तुम्ही पूर्णपणे कार्ड किंवा UPI वर अवलंबून असाल तर कधीकधी तुम्ही अडचणीत येऊ शकता. म्हणून, नेहमी काही रोख रक्कम सोबत ठेवा. याव्यतिरिक्त, काही दुकानदार डिजिटल पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क आकारतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही, गर्दीच्या ठिकाणी रोख रक्कम आणि कार्डचा वापर संतुलित पद्धतीने करणे हूशारीचे ठरेल.