Menstrual Cycle | मासिक पाळीमध्ये जास्त त्रास होतो ? महिलांनी ‘ही’ काळजी घ्यायला हवी

| Updated on: Jan 06, 2022 | 12:40 PM

मासिक पाळीदरम्यान महिलांना चटपट खाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच या काळात थंड पदार्थ खाण्याचे सांगितले जाते. मात्र जास्त थंड पदार्थ खाण्यामुळे अनेक अवयवांवर सूज येते. परिणामी ब्लडिंग व्यवस्थित होत नाही. पण मासिक पाळीदरम्यान महिलांनी फक्त पौष्टिक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

Menstrual Cycle | मासिक पाळीमध्ये जास्त त्रास होतो ? महिलांनी ही काळजी घ्यायला हवी
MENSTRUAL CYCLE
Follow us on

मुंबई : मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. महिलांच्या मांसपेशी आखडून जातात. तसेच डोकेदुखी, पोटदुखी, सूज, थकवा, चिडचिड, उदासी, राग अशा समस्या महिलांना जाणवतात. महिलांचा आहार तसेच खानपानाच्या सवयी यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत असतात. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान आहारासंबंधी काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

मासिक पाळीदरम्यान महिलांना चटपट खाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच या काळात थंड पदार्थ खाण्याचे सांगितले जाते. मात्र जास्त थंड पदार्थ खाण्यामुळे अनेक अवयवांवर सूज येते. परिणामी ब्लडिंग व्यवस्थित होत नाही. त्यामुळे मासिक पाळीमध्ये महिलांनी फक्त पौष्टिक पदार्थ खावेत.

मासिक पाळीदरम्यान काय खावं ?

भरपूर पाणी प्यावे

जास्त पाणी पिल्याने कधीही फायदेशीर असते. पाणी जास्त पिल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. मासिक पाळीमध्ये शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नये. कोमट पाणी पिणे जास्त चांगले आहे.

पुदीना चहा प्या

या काळात पुदीन्याचा चहा प्यावा. या चहामुळे पोटदुखी, मळमळ आणि गॅस इत्यादी दूर होतात. ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यांनी पुदीन्याचा चहा हमखास प्यायला हवा.

लोहयुक्त आहार घ्यावा

मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील रक्त कमी होते. तसेच बल्डिंगमुळे रक्त जाते. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासू नये म्हणून लोहयुक्त आहार घ्यायला हवा. पालक, केळी, भोपळा, बीट असे लोहयुक्त पदार्थ खायला हवेत.

प्रथिनेयुक्त आहार घ्यायला हवा

मासिक पाळीच्या काळात महिलांनी प्रथिनेयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. डाळ, मिल्कशेक, दही, दूध, मांसाहार, अंडी, मासे, अंकुरलेले धान्य अशा अन्नपदार्थांमध्ये प्रथिने असतात. त्यामुळे या पर्थांचा आहारात समावेश करावा.

शरीरातील कॅल्शियम कमी होऊ देऊ नका

मासिक पाळीमध्ये शरीरात कॅल्शियम कमी होणार नाही, याची काळजी घ्या. कॅल्शियमसाठी तुमच्या आहारात नट्स, डेअरी उत्पादन, हाड असणारे मासे अशा पदार्थांचा समावेश असलेले अन्न खावे.

(वरील माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या संकेतस्थळांवरुन घेण्यात आली आहे. एकदा डॉक्टरांना अवश्य भेटावे )

इतर बातम्या :

Glowing Skin : हिवाळ्यात चमकदार आणि तजेलदार त्वचेसाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय फायदेशीर!

Pregnancy | नॉर्मल डिलिव्हरी हवीय ? मग या गोष्टी नक्की करा

Bloating Remedy: जेवल्यानंतर पोटात तयार होतो गॅस, औषधांपेक्षा अधिक फायदेशीर आहेत या 7 औषधी वनस्पती