AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डास या व्यक्तींनाच जास्त का चावतात? कारण जाणून हैराण व्हाल

पावसाळ्यात डासांचा त्रास वाढतो. पण काही लोकांनाच डास जास्त का चावतात? असा कधी विचार केला आहे का तुम्ही. होय अशी बरीच कारणं आहेत ज्यामुळे डास काही विशिष्ट व्यक्तींनाच जास्त चावतात. चला जाणून घेऊयात कोणती आहेत ती कारणे?

डास या व्यक्तींनाच जास्त का चावतात? कारण जाणून हैराण व्हाल
why do mosquitoes bite some people more than othersImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 12, 2025 | 2:00 PM
Share

पावसाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे डासांचा. कारण पावसाळ्यातच मोठ्या प्रमाणात डास दिसून येतात. डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, झिका, चिकुनगुनिया असे अनेकआजार उद्धभवतात. त्यामुळे नक्कीच त्यापासून आपला बचाव करणे अत्यंत महत्त्वाचे असते. पण तुम्ही कधी हे लक्षात घेतलं आहे का? की काही विशिष्ट लोकांनाच डास सगळ्यात जास्त चावतात. पण यामागे ही काही कारणं आहेत ज्यामुळे डास काही विशिष्ट लोकांनाच चावतात. कारण जाणून तुम्हीही हैराण व्हाल. चला जाणून घेऊयात याची कारण काय असतात.

शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, माणसांना फक्त मादी डासच चावतात. याचे कारण मादी पुनरुत्पादनाशी संबंधित आहे. खरं तर मादी डास मानवी रक्तात असलेले पोषक आहार घेतल्यानंतरच अंडी देतात.

हा वास डासांना माणसांकडे वेगाने आकर्षित करतो

डासांना कार्बन डाय ऑक्साईडचा वास देखील माणसांकडे वेगाने आकर्षित करतो. मादी डास त्याच्या संवेदनाक्षम जीवांसह त्याचा वास शोधतो. मानवी शरीरातून श्वास बाहेर टाकताना सीओ 2 वायू बाहेर पडल्यामुळे डास काही लोकांना चावतात. 150 फूट अंतरावरुन देखील डासांना त्याचा वास अगदी सहजपणे ओळखता येतो.

संशोधकांचा असा दावा आहे की, काही वास डासांना अधिक वेगाने आकर्षित करतात. मानवी त्वचेमध्ये राहणा-या बॅक्टेरियातून सोडल्या जाणार्‍या युरिक अॅसिड, लॅक्टिक अॅसिड आणि अमोनियाच्या गंधापेक्षा डास मानवांच्या जवळपास फिरतात. शरीराच्या तापमानामुळे, हे घटक एखाद्या व्यक्तीच्या घामामध्येही आढळतात. काही रक्तगट डासांसाठी चुंबकांसारखे काम करतात. तर ‘बी’ रक्तगटाच्या लोकांना डास सामान्यत: च कमी प्रमाणात चावतात.

डास जास्त आकर्षित होण्याचे मुख्य घटक: 1. रक्त प्रकार अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, ओ (O) रक्तगटाच्या लोकांना डास ए (A) रक्तगटाच्या तुलनेत जास्त आकर्षित होतात.

2. कार्बन डायऑक्साइड डास कार्बन डायऑक्साइडच्या वासाला आकर्षित होतात. लठ्ठ व्यक्ती आणि जास्त चयापचय क्रिया असणाऱ्या व्यक्ती जास्त कार्बन डायऑक्साइड सोडतात, त्यामुळे ते अधिक डास आकर्षित करतात.

3. शरीराचा वास डास आपल्या शरीराच्या वासाला देखील आकर्षित होतात.

4. तापमान डासांना गरम आणि दमट हवामान आवडते.

5. शरीराचे तापमान डासांना गरम शरीराचे तापमान आकर्षित करते.

6. चयापचय क्रिया चयापचय क्रिया जास्त असणाऱ्या व्यक्तींना डास जास्त आकर्षित होतात, कारण त्यांना जास्त कार्बन डायऑक्साइड आणि गरम तापमान निर्माण होते.

तर अशा काही कारणांमुळे डास काही व्यक्तींना जास्त चावतात, हे अनेक घटकांवर अवलंबून असते. रक्त प्रकार, कार्बन डायऑक्साइड, शरीराचा वास, तापमान आणि चयापचय क्रिया यांसारखे घटक डासांना आकर्षित करतात.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.