AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sweets : जास्त ‘राग-ताण’ आल्यावर मिठाई खाण्याची इच्छा का होते? जाणून घ्या, मेंदू आणि चव यांचे ‘गूढ नाते’ संशोधनाअंती माहिती आली समोर

शरीरातील प्रत्येक लहान-मोठ्या क्रियांचा थेट संबंध मनाशी असतो. तणावासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम करू शकतात. अभ्यासात असे आढळून आले आहे की जास्त तणाव असलेल्या लोकांना कालांतराने मधुमेहाचा धोका वाढतो.

Sweets : जास्त ‘राग-ताण’ आल्यावर मिठाई खाण्याची इच्छा का होते? जाणून घ्या, मेंदू आणि चव यांचे 'गूढ नाते' संशोधनाअंती माहिती आली समोर
| Updated on: Jul 11, 2022 | 6:31 PM
Share

शरीरातील प्रत्येक लहान-मोठ्या क्रियांचा थेट संबंध मेंदू शी (Direct contact with the brain) असतो. पाय कधी हलवायचे, शरीरात कधी खाज सुटते, झोपेतून उठणे, खाण्याची इच्छा या सर्व गोष्टी मेंदूवर चालतात. यामुळेच मन शांत आणि निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य तज्ञ उपाय करण्याची शिफारस करतात. तणावाखाली, मेंदूमध्ये काही क्रिया घडतात ज्यामुळे मधुमेहाचा विकास होऊ शकतो. तणावाखाली गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. तणावाच्या किंवा रागाच्या वेळी तुम्हालाही गोड खावेसे वाटते का? नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका लेखात, पुण्यातील चेल्लाराम डायबिटीज इन्स्टिट्यूटचे एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. उन्नीकृष्णन यांनी तणावाखाली मिठाई खाण्याची तीव्र इच्छा (Strong desire) होण्याची कारणे स्पष्ट केली आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की, जे लोक अनुवांशिकदृष्ट्या मधुमेहास बळी पडतात त्यांनी ते टाळण्यासाठी उपाय करत राहावे. परंतु तणावपूर्ण परिस्थितीत (In stressful situations) गोड खाण्याची इच्छा का होते? संशोधनाअंती काय सत्य समोर आले जाणून घ्या, सविस्तर माहिती.

गोड खाण्याची इच्छा का होते

डॉ उन्नीकृष्णन याविषयी सांगतात, तणावाच्या स्थितीत मेंदूमध्ये अशा काही रासायनिक क्रिया होतात, ज्यामुळे तुमची गोड पदार्थ खाण्याची लालसा वाढते. यामध्ये सुद्धा न्यूरोट्रांसमीटर डोपामाइन, ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो. डॉ. उन्नीकृष्णन यांच्या मते, जेव्हाही आपण काहीतरी गोड खातो तेव्हा जिभेवरील चव रिसेप्टर्स उत्तेजित होतात, जे मज्जासंस्थेद्वारे मेंदूला विद्यूत सिग्नल पाठवतात. हे नैसर्गिकरित्या डोपामाइनची पातळी वाढवते ज्यामुळे आपल्याला आनंद होतो. हे आपल्याला अधिक गोड खाण्यास उत्तेजित करते.

भावनिक परिस्थितीत अधिक इच्छ

जेव्हा जेव्हा आपण भावनिक क्षणांमध्ये असतो, जसे की तणाव-चिंता, राग-दुःख, तेव्हा शरीर अॅड्रेनालाईन आणि कोर्टिसोल स्ट्रेस हार्मोन्स सोडते. हे हार्मोन्स हृदय गती आणि रक्तदाब वाढवण्याबरोबरच चयापचय गती वाढवण्याचा प्रयत्न करतात. या परिस्थितीत, तुम्हाला अशक्त आणि थकल्यासारखे वाटते. ज्यापासून मुक्त होण्यासाठी कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असते आणि शरीराला उर्जेची आवश्यकता असते. यामुळेच अशा भावनिक अवस्थेत आपल्याला गोड पदार्थ आणि कार्बोहायड्रेट असलेल्या गोष्टी खाण्याची तीव्र इच्छा जाणवते.

इच्छा होत असली तरी, खाऊ नका

कार्बोहायड्रेट्सच्या पचनाने रक्तात साखर तयार होते. संशोधनात असे आढळून आले आहे की, मेंदूच्या पेशी रक्तातील ग्लुकोजवर थेट प्रतिक्रिया देतात. शरीरात डोपामाइनचा मारा झाल्यास जास्त मिठाई खाण्याची इच्छा होण्यामागेही एक कारण म्हणून पाहिले जाते. जास्त ताणतणाव झाल्यास वजन वाढण्याचा किंवा मधुमेहाचा धोका निर्माण करणारा घटक म्हणूनही याकडे पाहिले जाते. जेव्हा आपण तणावाच्या स्थितीत जास्त साखरयुक्त पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट खातो तेव्हा त्यामुळे वजन आणि मधुमेह दोन्ही वाढतात. डॉ. उन्नीकृष्णन यांच्या मते, मेंदूची ही कार्ये लक्षात घेऊन, भावनिक परिस्थितीत आहाराच्या निवडीबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.