पावसाळ्यात त्वचेला खाज येण्याची समस्या अधिक वाढते? तर करू नका ‘या’ चुका
पावसाळ्यात आपल्याला केवळ आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागत नाही तर आपल्या त्वचेचीही अधिक काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूत त्वचेच्या समस्या वाढतात. ज्यामुळे आपली त्वचा खराब होते. तर मग पावसाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे या लेखात जाणून घेऊया.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात दमटपणा असतो. त्यामुळे हवेतील आर्द्रता आणखी वाढते. ज्यामुळे त्वचेला चिकटपणा येत असतो. आर्द्रतेमध्ये सामान्यपेक्षा जास्त घाम येतो, ज्यामुळे त्वचेच्या समस्या वाढतात, ज्यामुळे खाज सुटणे, बुरशीजन्य संसर्ग, जळजळ यासारख्या समस्या उद्भवू लागतात. पावसाळ्यात त्वचेवर खाज येण्याची अनेक कारणे असू शकतात, ती वेळीच ओळखून तुम्ही त्यापासून मुक्त होऊ शकता. त्वचेवर खाज येण्याच्या समस्येमुळे काही लोकांना त्वचेवर पुरळ आणि सूज येण्याची समस्या देखील उद्भवते.
यावेळी जयपूरच्या आयुर्वेद तज्ञ किरण गुप्ता यांनी सांगितले की पावसाळ्यात आर्द्रतेमुळे त्वचेला चिकटपणा येतो, ज्यामुळे बहुतेक लोकं कमी पाणी पितात. या ऋतूत आपण बाजारातून खरेदी केलेल्या भाज्या किंवा फळांमध्ये बॅक्टेरिया आणि जंतू असतात जे आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी हानिकारक असतात. जर आपण स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर यामुळे त्वचेच्या समस्या देखील वाढतात.
पावसाळ्यात जळजळ आणि खाज येण्याची समस्या का वाढते?
आर्द्रता आणि घाम हे कारण आहे
पावसाळ्यात हवेत आर्द्रता वाढते. आर्द्रता वाढली की त्वचेला घाम येत राहतो ज्यामुळे चिकटपणा येतो. खरं तर आर्द्रता आणि घामामुळे खाज सुटण्याची समस्या वाढते. कारण घाम आणि घाणीमुळे बॅक्टेरिया आणि फंगल वाढू लागतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या वाढतात.
स्वच्छतेचा अभाव
जर तुम्ही पावसाळ्यात तुमच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवला नाही तर तुम्हाला चेहऱ्यावर जळजळ आणि खाज सुटणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
सुती कपडे न घालणे
उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात तुम्ही फक्त सुती कपडे घालावेत. कारण हे सुती कपडे आरामदायी असण्यासोबतच तुमच्या त्वचेला जळजळ होऊ देत नाहीत. कारण हे मऊ कापड तुमच्या त्वचेला खाज सुटणे आणि जळजळ होण्याच्या समस्येपासून वाचवते.
दररोज आंघोळ न करणे
काही लोक असे आहेत जे पावसाळ्यातही आंघोळ करत नाहीत. पण तुम्ही हे करू नये. पावसाळ्यात शरीर अधिक स्वच्छ ठेवण्याची गरज असते. म्हणून, या ऋतूत तुम्ही आंघोळ करायलाच हवी. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कडुलिंबाच्या पाण्यानेही आंघोळ करू शकता, ज्यामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि बॅक्टेरियाचा धोका कमी होतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
