AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात अन्न गरम ठेवायचंय? मग वापरा या सोप्या ट्रिक्स

अन्न उबदार ठेवण्यासाठी आपण अनेकदा जेवण पुन्हा पुन्हा गरम करत असतो. पण असं न करता या सोप्या उपायाने हिवाळ्यात तुमचे जेवण बराच काळ गरम राहील.

हिवाळ्यात अन्न गरम ठेवायचंय? मग वापरा या सोप्या ट्रिक्स
food
| Updated on: Nov 22, 2024 | 7:35 PM
Share

थंडीचा महिना सुरु झालेला आहे. या दिवसात हवामान जेवढं आल्हाददायक असतं तेवढीच सर्व आव्हानंही घेऊन येतं. याकरिता थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण उबदार कपडे घालतो. पण तुम्ही हा विचार केला आहे का अन्न थंड होण्यापासून कसे रोखणार? हिवाळ्यात शिजवलेली डाळ आणि भाज्या थोड्याच वेळात थंड होतात. त्यामुळे हिवाळ्यात जेवण जास्त वेळ गरम कसे ठेवावे?

थंडीत तुम्ही जेवण पुन्हा पुन्हा गरम केले तर अन्नातील पोषक तत्वेही नष्ट होतात. पण ही समस्या टाळण्यासाठी सोप्या टिप्स फॉलो केल्या जाऊ शकतात. तर येथे आम्ही तुम्हाला असे सोपे उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे हिवाळ्यात तुमचे जेवण बराच काळ गरम राहील.

ॲल्युमिनियम फॉयल

अन्न उबदार ठेवण्यासाठी आपण अनेकदा ॲल्युमिनियम फॉईल चा वापर करतो. अशातच तुम्ही जर ॲल्युमिनियम फॉयल भांड्यावर ठेवल्यास अन्नही उबदार राहील.तसेच तुम्ही एका कागदात भाकरी आणि पराठे एकत्र गुंडाळून घ्या. नंतर ते ॲल्युमिनियममध्ये गुंडाळून ठेऊ शकता असे केल्याने सकाळी बनवलेली रोटी दुपारपर्यंत उबदार राहील.

थर्मल बॅग

थर्मल बॅगच्या साह्यानेही तुमचं जेवण गरम ठेवू शकता हे तुम्हाला माहिती आहे का? वृत्तपत्र, प्लास्टिक आणि कापडाचे अनेक थर वापरून आपण इन्सुलेटेड वाहक तयार करता. हिट सील करण्यासाठी तुम्ही तुमचे जेवण फूड कंटेनरपासून बनवलेल्या पिशवीत ठेवा.अशाने जेवण गरम राहील.

पितळाची भांडी

हिवाळ्यात तुम्ही पितळापासून बनवलेल्या भांड्यांमध्येही अन्न ठेऊ शकता. हिवाळ्यात अन्न गरम ठेवण्यासाठी ही पारंपरिक भांडी हा उत्तम पर्याय आहे. हे केवळ जेवण उबदार ठेवत नाही तर आपला जेवणाची चव देखील वाढवते. जर तुम्ही आतापर्यंत बॉक्समध्ये पितळाची भांडी ठेवली असतील तर ती बाहेर काढण्याची वेळ आली आहे.

या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही हिवाळ्यात मायक्रोवेव्हशिवाय बराच वेळ अन्न गरम ठेवू शकता. यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा अन्न गरम करण्याची गरज पडणार नाही.

Follow Us
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब
देशाच्या संविधानावर विश्वास...राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
Sanjay Raut | देशाच्या संविधानावर विश्वास..., खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय... संजय राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?