AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s Health Tips : प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी महिलांनी फॉलो कराव्यात ‘या’ सोप्या टिप्स!

आजकाल अनेक स्त्रिया खराब जीवनशैली, जास्त ताण आणि चुकीचा आहार यामुळे वंध्यत्वाला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत काही सोप्या टिप्स फॉलो करून महिला या समस्येपासून मुक्त होऊ शकतात.

Women's Health Tips : प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी महिलांनी फॉलो कराव्यात ‘या’ सोप्या टिप्स!
Pregnant WomenImage Credit source: Google
| Updated on: Aug 03, 2022 | 10:06 PM
Share

आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची भावना असते. आई बनण्याची देणगी ही निसर्गाने दिलेली एक अद्भुत देणगी (wonderful gift) आहे. परंतु आजकाल खराब जीवनशैली, चुकीच आहार, वाईट सवयी इत्यादींमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्व येत आहे. महिलांच्या शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे महिला वंध्यत्वाच्या बळी (Victims of infertility) ठरत आहेत. त्याच वेळी, एका संशोधनानुसार, तणावामुळे महिलांमध्ये वंध्यत्व देखील येऊ शकते. खरं तर, अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासानुसार, जास्त ताणतणाव (High stress) महिलांमध्ये वंध्यत्व निर्माण करू शकतात. संशोधकांच्या मते, कमी पातळीचा तणाव असलेल्या महिलांच्या तुलनेत दर महिन्याला जास्त तणाव असलेल्या महिलांमध्ये गर्भधारणेची 29 टक्के शक्यता असते. जास्त तणावामुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन होते. यामुळे स्त्रीला गर्भधारणा न होण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

निरोगी जीवनशैली

चुकीच्या खाण्याच्या सवयींमध्ये धूम्रपान, मद्यपान, ड्रग्ज इ. याशिवाय धकाधकीच्या नोकऱ्या, वैवाहिक कलह यांसारख्या गोष्टींमुळे जास्त ताण येतो. अशा परिस्थितीत निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही वंध्यत्वाच्या समस्येपासूनही सुटका मिळवू शकता.

चांगली झोप

चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला खूप थकवा आणि चिडचिड वाटते. अशा परिस्थितीत दररोज किमान 6 ते 7 तासांची झोप घ्या. झोपण्याच्या वेळेची नियमित दिनचर्या राखणे महत्वाचे आहे.

झोपेच्या वेळेपूर्वी ईमेल आणि कॉल टाळा

झोपायच्या आधी किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असता तेव्हा ईमेल वाचणे किंवा कॉल करणे टाळा. जोडीदारासोबत वेळ घालवा. यामुळे तुम्हाला खूप आराम वाटेल

धूम्रपान आणि मद्यपान

धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयी सोडा. या सवयी तुम्हाला अडचणीत आणू शकतात. यामुळे तुम्हाला गर्भधारणा करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे अशा सवयी लगेच सोडून द्या.

लॅपटॉप, संगणक आणि फोनचा वापर मर्यादित करा

लॅपटॉप, संगणक आणि फोन यासारख्या गोष्टींचा मर्यादित वापर करा. विशेषत: रात्रीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरणे टाळा. लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि फोनमधून निघणारे किरण तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याचा तुमच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो.

निरोगी आहार

निरोगी आहार घेणे खूप महत्वाचे आहे. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही आहारात हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, फळे इत्यादींचा समावेश करू शकता.

व्यायाम सल्ला घ्या

तुमची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी प्रजनन क्षमता तज्ञाचा व्यायामाबाबत सल्ला घ्या.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.