AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरकुत्या होतील कमी, चेहरा होईल सॉफ्ट, ‘या’ 3 गोष्टींनी बनवा कोलाजन क्रीम

चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कोलेजनच्या कमतरतेमुळे येतात. यावर मात करण्यासाठी तुम्ही घरगुती पद्धतीने तयार कोलेजन क्रीमचा वापर करू शकता, जी तुमची त्वचा मऊ करेल आणि सुरकुत्या कमी करेल. चला तर मग ही कोलेजन क्रीम घरी कशी बनवू शकता ते जाणून घेऊयात.

सुरकुत्या होतील कमी, चेहरा होईल सॉफ्ट, 'या' 3 गोष्टींनी बनवा कोलाजन क्रीम
कोलाजन क्रीमImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 18, 2026 | 12:20 PM
Share

आजकाल त्वचेशी संबंधित समस्या अधिक सामान्य होत चालेल्या आहेत. जेव्हा आपण आहाराकडे आणि जीवनशैलीकडे योग्य लक्ष देत नाही, तेव्हा त्याचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच नाही, तर आपल्या त्वचेवर आणि केसांवरही होतो. कमी वयातच चेहऱ्यावर बारीक रेषा, सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दिसायला लागले आहेत. तर हे त्वचेतील कोलेजनच्या कमतरतेमुळे होते. त्यामुळे अंतर्गत पोषणासोबतच त्वचेची बाहेरील काळजी घेणेही आवश्यक आहे. तर आजच्या लेखात आपण कोलेजन क्रीम कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत. कोलेजन बनवण्यासाठी फक्त तीन गोष्टींची आवश्यकता असते. ही घरगुती कोलेजन क्रीम केवळ सुरकुत्या कमी करणार नाही, तर तुमची त्वचा मऊ देखील करेल.

कोलेजन क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ही घरगुती क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला 2 मोठे चमचे तांदळाचे पाणी, 1 मोठा चमचा कोरफड जेल आणि 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागेल.

तांदळाचे पाणी कसे बनवायचे?

तुम्ही 2 मोठे चमचे कच्चा तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा कप पाण्यात 30 मिनिटे भिजवून ठेवावा. त्यानंतर हे पाणी एका भांड्यात गाळून घ्या.

कोलेजन क्रीम कसे बनवायचे?

एका भांड्यात 2 मोठे चमचे तांदळाचे पाणी आणि 1 मोठा चमचा कोरफड जेल घ्या. नंतर त्यात 2 मोठे चमचे व्हिटॅमिन ई तेल टाका आणि तिन्ही गोष्टी पूर्णपणे एकजीव होईपर्यंत चमच्याने चांगले मिक्स करा. तुम्ही यासाठी व्हिस्कर किंवा ब्लेंडरचाही वापर करू शकता.

कसे वापरायचे?

ही कोलेजन क्रीम एका लहान काचेच्या बाटलीत साठवून ठेवा. दररोज रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर, ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि काही मिनिटे हलक्या हाताने मालिश करा. रात्रभर तसेच राहू द्या. काही दिवसांतच, तुमची त्वचा केवळ चमकदारच नाही, तर मऊदेखील दिसेल.

या गोष्टी खाणे फायदेशीर आहे

कोलेजन वाढवण्यासाठी, तुम्ही आवळा, संत्री, लिंबू, पेरू आणि विविध प्रकारची बेरी यांसारखे व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थ खावेत. अमिनो ॲसिडसाठी, बदाम, काजू, चिया, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या बिया खाव्यात. यामुळे इतर अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगले फॅट्स मिळून तुमच्या आरोग्याला लक्षणीय फायदा होतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी