Horoscope | नवं वर्ष कसं असणार?, आरोग्य, धनलाभ कधी होणार?; जाणून घ्या सगळं काही एका क्लिकवर

या वर्षात आपल्यासोबत काय काय गोष्टी घडू शकतात, आपल्या गृहताऱ्यांची दशा काय असेल?, ते जाणून घेऊयात. (yearly horoscope 2021)

Horoscope | नवं वर्ष कसं असणार?, आरोग्य, धनलाभ कधी होणार?; जाणून घ्या सगळं काही एका क्लिकवर
| Updated on: Jan 01, 2021 | 2:48 PM

मुंबई :नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. अनेक संकल्प घेऊन आयुष्यात सकारात्मक गोष्टी करण्यासाठी अनेकांनी संकल्प केला असेल. मात्र, आपल्या राशीमध्ये गृह ताऱ्यांची दशासुद्धा आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षात आपल्यासोबत घडू शकणाऱ्या गोष्टींचा धांडोळा घेणे गरजेचे आहे. तर या वर्षी आपल्यासोबत काय काय गोष्टी घडू शकतात, आपल्या गृहताऱ्यांची (Horoscope ) दशा काय असेल?, ते जाणून घेऊयात.

 

मेष

करियर : केलेल्या कामाला यश येईल, त्यामुळे भरभराट येईल. मात्र, कोणतेही काम करण्यासाठी योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

आर्थिक : या वर्षात एकूण खर्च वाढेल. असे असले तरी एप्रिलनंतर घरातील तसेच, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या खर्चामध्ये सुधार होईल.

लग्न : वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सामंजस्याने वागा.

आरोग्य : गोष्टी जुळून न आल्यामुळे चिडचिड निर्माण होईल. त्यामुळे शांतता बाळगा.

 

वृषभ :

करियर : करियरच्या दृष्टकोनातून चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात.

आर्थिक : आर्थिक दृष्टीने विचार करायचा झाल्यास हे वर्ष संमिश्र स्वरुपाचे असेल. 6 एप्रिलनंतर आर्थिक दृष्टीकोनातून थोडी स्थिरता येईल.

लग्न : तुमच्या जोडीदाराच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

आरोग्य : स्व:तच्या आरोग्याला जपणे गरजेचे आहे. आहार व्यवस्थित घ्या.

 

मिथून :

करियर : करियरच्या दृष्टीकोनातून काही सकारात्मक गोष्टी घडतील.

आर्थिक : व्यवसाय भरभराटीला येईल. जवळचे पैसै वाढतील.

लग्न : वैवाहिक जीवनात रोमान्स वाढेल. दोघांमध्ये गोडी निर्माण होईल.

आरोग्य : स्व:तच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

 

कर्क :

करियर : महिलांशी विवाद होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या.

आर्थिक : या वर्षी आर्थिक दृष्टीकोनातून खास घटना घडणार नाहीत. हे वर्ष सामान्य असेल.

लग्न : वैवाहिक जीवनात काही गोष्टी सकारात्मक घडतील. संमिश्र प्रकारचे अनुभव असतील.

आरोग्य : या वर्षात दुर्घटना किंवा अपघात होऊ शकतो. त्यामुळे खास काळजी घेण्याची गरज आहे.

 

सिंह  :

करियर : करियरच्या दृष्टिकोनातून हे वर्ष चांगले असेल. या वर्षात चांगले यश मिळू शकेल. किंवा पदोन्नती सारखे लाभ होतील.

आर्थिक : आर्थिक चणचण भासेल. त्यामुळे काटकसरीने वागावे.

लग्न : वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे समजदारीने वागावे.

आरोग्य : आजार बळाऊ शकतो. त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

 

कन्या :

करियर : कष्ट करावे लागतील. मेहनत घेतली तर निश्चित परिणाम मिळेल.

आर्थिक : डिसेंबममध्ये मोठा आर्थिक लाभ मिळेल.

विवाह : वैवाहिक जीवनात कधी भांडण तर कधी गोडवा निर्माण होईल.

आरोग्य : आरोग्याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही. ठणठणीत राहाल.

 

तुळ :

करियर : करियरच्या दृष्टिकोनातून चांगले यश मिळेल.

आर्थिक : संमिश्र स्वरुपाची स्थिती असेल. त्यामुळे योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

लग्न : वैवाहिक जीवनात थोड्याफार प्रमाणात वाद होतील.

आरोग्य : काळजी घेण्याची गरज. गाफील राहू नये.

 

कुंभ :

करियर : हवं ते मिळेल. उन्नती होईल.

आर्थिक : आर्थिक परिस्थिती बिकट असेल. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे.

लग्न : नात्यात विश्वास निर्माण होईल. नातं चांगलं फुलेल.

आरोग्य : चिंताजनक आजार होणार नाही. काळजी करण्यासारखं काही नाही.

मीन :

करियर : करियरच्या बाबतीत काही सकारात्मक गोष्टी घडतील. भरभराट होईल.

आर्थिक : समतोल साधावा लागेल. संमिश्र परिणाम असतील.

लग्न : वैवाहिक जीवन सुखी असेल. काही अडचणी येणार नाहीत.

आरोग्य : स्वास्थ्याबाबत अडचणी येणार नाहीत. काळजी करण्याचं कारण नाही.

वृश्चिक :

करियर : कामाचा व्याप वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ मिळेल.

आर्थिक : हे वर्ष आर्थिक दृष्टिकोनातून भरभराटीचे असेल.

लग्न : वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो.

आरोग्य : या वर्षात आरोग्यासंबंधी काही तक्रारी येऊ शकतात. संमिश्र स्वरुपाचे हे वर्ष असेल.

 

धनू :

करियर : या वर्षात चांगल्या गोष्टी घडून येतील. चांगले वर्ष असेल.

आर्थिक : आर्थिक दृष्टिकोनातूनही हे वर्ष चांगले असेल. काही अडचणी येणार नाहीत.

लग्न : जोडीदाराची काळजी घेणे गरजेचे आहे.

आरोग्य : आजार होण्याची शक्यता. त्यामुळे योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

 

मकर :

करियर : योग्य फळ मिळेल. करियरमध्ये चांगल्या गोष्टी घडून येतील.

आर्थिक : चणचण जाणवू शकते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

लग्न : नात्यात गोडवा निर्माण होईल. नातं वृद्धींगत होईल.

आरोग्य : आरोग्य चांगले राहील. काळजी करण्याचं कारण नाही.

संंबंधित बातम्या :

Horoscope | मेष राशीसाठी 2021 कसं असेल? वैवाहिक जीवनात होऊ शकतो ‘हा’ मोठा बदल