Horoscope | मेष राशीसाठी 2021 कसं असेल? वैवाहिक जीवनात होऊ शकतो ‘हा’ मोठा बदल

Horoscope | मेष राशीसाठी 2021 कसं असेल? वैवाहिक जीवनात होऊ शकतो 'हा' मोठा बदल

मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. अनेक संकल्प घेऊन आयुष्यात सकारात्मक गोष्टी करण्यासाठी अनेकांनी संकल्प केला असेल. मात्र, आपल्या राशीमध्ये गृह ताऱ्यांची दशासुद्धा आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. मेष राशीसाठी हे वर्ष अनेक अर्थांनी महत्त्वाचे असेल. मेष राशी असणाऱ्यांच्या जीवनात आर्थिक लाभापासून ते आरोग्यापर्यंत अशा बाबींमध्ये चढउतार पाहायला मिळणार आहेत. मेष राशीसाठी हे वर्ष आशादायक […]

prajwal dhage

| Edited By: सचिन पाटील

Jan 08, 2021 | 4:50 PM

मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. अनेक संकल्प घेऊन आयुष्यात सकारात्मक गोष्टी करण्यासाठी अनेकांनी संकल्प केला असेल. मात्र, आपल्या राशीमध्ये गृह ताऱ्यांची दशासुद्धा आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. मेष राशीसाठी हे वर्ष अनेक अर्थांनी महत्त्वाचे असेल. मेष राशी असणाऱ्यांच्या जीवनात आर्थिक लाभापासून ते आरोग्यापर्यंत अशा बाबींमध्ये चढउतार पाहायला मिळणार आहेत. मेष राशीसाठी हे वर्ष आशादायक असेल. तसेच विभिन्न प्रकारच्या भौतिक सुखाचा लाभ या वर्षी मिळू शकतो. जाणून घेऊयात मेष राशी असणाऱ्यांसाठी हे वर्ष कसे असेल.

करियर आणि व्यापार

मेष राशीवर  या वर्षी शनीदेवाची कृपादृष्टी असेल. त्यामुळे करियरच्या दृष्टीकोनातून मेष राशी असलेल्यांसाठी चांगल्या गोष्टी घडतील. तसेच नोकरीवर असताना सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणीही सकारात्मक वातावरण असेल. कुठला नवा व्यापार करण्याचा विचार असेल तर मेष राशीसाठी हे वर्ष आव्हानात्मक ठरु शकते. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना योग्य आणि सर्व बाजू पडताळूनच रणनीती आखायला हवी. तसेच व्यापारात रचनात्मक प्रयत्नांची गजर आहे.

आर्थिक- पारिवारिक जीवन

आर्थिक दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास मेष राशीसाठी हे वर्ष थोडं प्रतिकूल असेल. कारण या वर्षी मिळकत किंवा पगारापेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी एप्रिल आणि सप्टेंबरच्या मध्यात गुरुच्या प्रवेशामुळे आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत थोड्या सुधारणाही होतील. या वर्षी कुटुंबावर शनीचा प्रभाव असल्यामुळे पारिवारिक जीवनात थोडी अशांतता असेल. तसेच घरातून हवे तसे सहकार्य मिळणार नाही. त्यामुळे काही काळासाठी एकाकी असल्यासारखं वाटू शकतं.

प्रेम-वैवाहिक जीवन

मेष राशीसाठी प्रेमामध्ये काही सकारात्मक गोष्टी घडून येतील. गुरु आणि शुक्रदेवाची कृपा असल्यामुळे प्रियकर किंवा प्रेयसीसोबत वेळ घालवण्यासाठी एकांत मिळेल. तसेच एप्रिल आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये प्रेमाच्या बाबतीत काही सकारात्मक बाबी घडतील. तर वैवाहिक जीवन म्हणावं तेवढं सकारात्मक नसेल. मंगळ गृहाचा प्रभाव असल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच, गैरसमजामुळेसुद्धा तुमच्या वैवाहिक जीवनात काही काळासाठी वादा निर्माण होऊ शकतो.

शिक्षण

शैक्षणिक दृष्टीकोनातून हे वर्ष संमिश्र स्वरुपाचे असेल. वर्षाच्या सुरुवातीला काही महिने मंगळ गृहाचा प्रभाव असल्यामुळे अभ्यासामध्ये तुमचे मन लागेल. तर मार्चनंतर तणापूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते.

काय करावे?

या वर्षी नकारात्मक शक्तींपासून वाचण्यासाठी सकाली उठून सूर्यदेवाचे दर्शन करावे. त्यांना अर्ध्य देऊन त्यांना नमस्कार करावा.

संबंधित बातम्या :

Happy New Year 2021: जाणून घ्या नव्या वर्षात कोणत्या गोष्टी महाग होणार?

PM-kisan Scheme : 6 दिवसांत 6.23 लाख शेतकऱ्यांना लाभ, जाणून घ्या पुढचा हप्ता कधी मिळणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें