Happy New Year 2021: जाणून घ्या नव्या वर्षात कोणत्या गोष्टी महाग होणार?

Happy New Year 2021: जाणून घ्या नव्या वर्षात कोणत्या गोष्टी महाग होणार?

यंदा तुम्ही कार किंवा बाईक खरेदी करणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. | what will get costly in new year

Rohit Dhamnaskar

|

Jan 01, 2021 | 10:03 AM

नवी दिल्ली: नववर्षाला (New year 2021) सुरुवात झाल्यामुळे आज देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या नववर्षात काही नवीन नियमही लागू होणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांचा खिसा कापला जाणार आहे. या नियमांमुळे टीव्ही, बाईकपासून कारपर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत. परिणामी तुमचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. (car bike and home appliances price will be increase in New year 2021)

कार आणि बाईकची खरेदी महाग

यंदा तुम्ही कार किंवा बाईक खरेदी करणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. स्टील, अ‍ॅल्युमिनियम आणि प्लॅस्टिकचे दर वाढल्याने कार आणि बाईक्सचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांच्या किंमतीमध्ये पाच टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वात मोठी वाहनिर्मिती कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आपल्या 12 कार मॉडेल्सच्या किंमतीत दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे मारुती सुझुकीच्या मॉडेल्सची किंमत 5 हजार ते 35 हजारापर्यंत वाढू शकते.

टीव्ही आणि फ्रीज महागणार

नव्या वर्षात एलईडी टीवी, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि घरगुती उत्पादनांच्या किंमतीत वाढ होणार आहे. या उत्पादनांची किंमत 10 ते 12 टक्क्यांनी वाढू शकते. तांबे, स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम या धातुंची किंमत वाढल्याने ही दरवाढ होणार असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय, जलवाहतूक आणि हवाई वाहतुकीचेही दर वाढणार आहेत. टीव्ही संचांच्या पॅनल्सची किंमत 200 टक्क्यांनी वाढणार आहे. तर क्रूड ऑईलमधील तेजीमुळे प्लॅस्टिकचा भाव वधारणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात पॅनासॉनिक इंडिया, एलजी आणि थॉमसन या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचे जाहीर केले आहे. तर सोनी कंपनीकडूनही उत्पादनांच्या दरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत.

गाड्यांवर FASTAG अनिवार्य

यंदाच्या वर्षात गाड्यांवर फास्टटॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. PayTM, Amazon, Snapdeal सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन त्याची खरेदी करता येऊ शकते. त्याचबरोबर देशातील 25 बँकांच्या माध्यमातूनही फास्टटॅगची खरेदी केली जाऊ शकते.

संबंधित बातम्या:

Happy New Year 2021 : नव्या वर्षात ‘या’ गोष्टी बदलणार, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम पडणार

Royal Enfield Meteor 350 चा जलवा, एका महिन्यात बंपर विक्री, बुलेटलाही मागे टाकले

Jio ग्राहकांना नव्या वर्षात मोठं गिफ्ट, कोणत्याही नंबरवर लोकल कॉल्स होणार फ्री

(car bike and home appliances price will be increase in New year 2021)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें