Jio ग्राहकांना नव्या वर्षात मोठं गिफ्ट, कोणत्याही नंबरवर लोकल कॉल्स होणार फ्री

कंपनीने जाहीर केल्यानुसार, 1 जानेवारी 2021 पासून सर्व लोकल व्हॉईस कॉल मोफत असणार आहेत.

Jio ग्राहकांना नव्या वर्षात मोठं गिफ्ट, कोणत्याही नंबरवर लोकल कॉल्स होणार फ्री
जिओच्या 20 रुपयांच्या प्लॅनमध्ये 49 IUC मिनिटस आणि 2GB डेटा मिळतो. तर 50 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50GB डेटा आणि 656 IUC मिनिटस मिळतात. 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये 10GB डेटा आणि 1,362 IUC मिनिटस मोफत मिळतात.

नवी दिल्ली : Jio Free Call On All Network : रिलायन्स जिओने (Reliance Jio) सर्व ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीने जाहीर केल्यानुसार, 1 जानेवारी 2021 पासून सर्व लोकल व्हॉईस कॉल मोफत असणार आहेत. काही महिन्यांपूर्वी रिलायन्स जिओने जिओच्या दुसर्‍या नंबरवर लोकल कॉल करण्यासाठी पैसे घेण्यास सुरुवात केली होती. यासाठी अनेक खास प्लॅनही कंपनीकडून ग्राहकांना देण्यात आले आहेत. (reliance jio Free Call On All Network from january 1 2021 removes iuc charges)

रिलायन्स जिओने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार,भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आदेशानुसार 1 जानेवारीपासून इंटरकनेक्ट वापर शुल्क (IUC) घरगुती व्हॉईस कॉलसाठी बंद केले जाणार आहेत. म्हणजेच, आता इतर नेटवर्कवर रिलायन्स जिओकडून कॉल करण्यासाठी स्वतंत्र पैसे घेतले जाणार नाहीत.

महत्त्वाचं म्हणजे इतर नेटवर्कमधून ग्राहकांना कॉल करण्यासाठी पैसे आकारले जातील असा निर्णय सप्टेंबर 2019 मध्ये रिलायन्स जिओने घेतला होता. यासाठी ट्राय कंपनीच्या आययूसी शुल्काचा हवाला देण्यात आला होता. पण आता ट्रायनेच आययूसी रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे रिलायन्स जिओने लोकल ऑफलाइन कॉलही मोफत करण्याचं जाहीर केलं आहे.

खरंतर, कंपनीने सर्व लोकल व्हॉईस कॉल मोफत केले याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठलाही प्लॅन अॅक्टिव्हेट न करता मोफत कॉल कराल. जे प्लॅन कंपनीकडून ग्राहकांना देण्यात आले आहेत. ते त्याच पद्धतीने काम करतील. पण त्या प्लॅनमध्ये तुम्हाला ऑन नेट आणि ऑफ नेट कॉलिंगवर कुठलाही चार्ज आकारला जाणार नाही. सप्टेंबरमध्ये कंपनीने शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती. पण आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीने ग्राहकांसाठी खास गिफ्ट आणलं आहे असं म्हणायला हरकत नाही. (reliance jio Free Call On All Network from january 1 2021 removes iuc charges)

संबंधित बातम्या – 

व्हॉट्सअ‍ॅपवर नंबर सेव्ह करणं झालं सोपं, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

फेसबुकवर तुम्ही हमकास करता ‘या’ चुका, सहज मिळते हॅकर्सला माहिती

नव्या वर्षात Amazon ची धमाकेदार ऑफर, Mega Salary Days Sale मध्ये ‘या’ वस्तूंवर मोठी सूट

(reliance jio Free Call On All Network from january 1 2021 removes iuc charges)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI