Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेसबुकवर तुम्ही हमकास करता ‘या’ चुका, सहज मिळते हॅकर्सला माहिती

काही लोक तर कोठेही जाताना फेसबुकवर एक पोस्ट (Facebook Post) तरी शेअर करत असतात. यामध्ये ते किती दिवसांसाठी कुठे चालले आहेत. हेसुद्धा सहजपणे सांगतात.

फेसबुकवर तुम्ही हमकास करता 'या' चुका, सहज मिळते हॅकर्सला माहिती
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 11:40 PM

नवी दिल्ली : जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आहे. फेसबुकचा वापर जितका जास्त वाढला आहे तितकीच त्याद्वारे फसवणूकदेखील वाढली आहे. हल्ली आपण सगळं काही फेसबुकवर शेअर करतो. व्ययक्तित, कौटुंबिक माहिती, फिरण्यापासून ते नोकरीपर्यंत सर्व गोष्टी आपण फेसबुकवर शेअर करतो. पण याचा हॅकर्सना खूप फायदा होत आहे. यामुळे तुमची सगळी माहिती काहीही न करता हॅकर्सपर्यंत पोहोचते. (dont do mistake on facebook post writing anything can be helpful for hacker)

काही लोक तर कोठेही जाताना फेसबुकवर एक पोस्ट (Facebook Post) तरी शेअर करत असतात. यामध्ये ते किती दिवसांसाठी कुठे चालले आहेत. हेसुद्धा सहजपणे सांगतात. त्यामुळे फेसबुकवर सक्रिय असणारे चोर तुमच्या घरी पोहोचणार नाहीत याचा काय भरोसा. खरंतर, फेसबुक हॅक झाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो. फेसबुकच्या अतिवापरामुळे गैरवापर झाल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही जाणून घेऊयात.

वैयक्तिक आयडी सार्वजनिक करू नका

अनेक नेटकऱ्यांनी त्यांचा आयडी कार्डचा फोटोदेखील शेअर करतात. याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आपल्या आयडीला नेमही पर्सनल ठेवा. यामध्ये नंबरदेखील पर्सनल करुन ठेवणं महत्त्वाचं आहे.

फ्रेंडलिस्टमध्ये कोणालाही जोडू नका

खरंतर, कोणाची फ्रेड लिस्ट जास्त आहे यावर सुद्धा हल्ली स्पर्धा होते. माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये 4000 लोक आहेत असं लोक मोठ्या अभिमानाने सांगतात. पण या नादात आपण कोणालाही अॅड करतो. आपल्याला माहित नसलेल्या लोकांना जोडण्याची आवश्यकता नाही. कारण हेच लोक डेटा चोरी करतात.

फेसबुकवरून इतर अ‍ॅप्समध्ये लॉगिन करून नका

फेसबुकवर आपल्याबद्दल सर्व काही माहिती उपलब्द असते. त्यामुळे फेसबुकवरून कुठल्याही अॅपमध्ये लॉगिन करू नका. कारण यामुळे डेटा लीकच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. (dont do mistake on facebook post writing anything can be helpful for hacker)

संबंधित बातम्या – 

व्हॉट्सअ‍ॅपवर नंबर सेव्ह करणं झालं सोपं, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

WhatsApp मधील ‘या’ 5 दमदार फिचर्सचा वापर करायलाच हवा

नव्या वर्षात Amazon ची धमाकेदार ऑफर, Mega Salary Days Sale मध्ये ‘या’ वस्तूंवर मोठी सूट

(dont do mistake on facebook post writing anything can be helpful for hacker)

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.