WhatsApp मधील ‘या’ 5 दमदार फिचर्सचा वापर करायलाच हवा

Whatsapp कंपनी युजर्सच्या मागणीनुसार सातत्याने नवनवे फिचर्स रोलआऊट करत असते. त्यामुळेच हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे.

WhatsApp मधील ‘या’ 5 दमदार फिचर्सचा वापर करायलाच हवा
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 9:08 PM

मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp नेहमीच युजर्सच्या मागणीनुसार अपडेट होत असतं. कंपनी युजर्सच्या मागणीनुसार सातत्याने नवनवे फिचर्स रोलआऊट करत असते. त्यामुळेच हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे.आता व्हॉट्सअ‍ॅप केवळ मेसेज पाठवण्यासाठी वापरलं जात नाही, तर कॉल करणे, व्हिडीओ कॉल करणे, बँकेशी संबंधित कामं करणे, ऑफिसशी संबंधित कामं करणे, ऑनलाईन पेमेंट करणे यांसारखी अनेक कामं Whatsapp च्या मदतीने केली जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच Whatsapp वरील पाच जबरदस्त फिचर्सबाबत माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुमचा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याचा एक्सपिरियन्स अजून भारी होईल. (5 Amazing features of whatsapp you Must Try)

1. तुमच्या खऱ्या (मूळ) मोबाईल नंबरऐवजी व्हर्च्युअल नंबरचा वापर करा

जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लोकांपासून लपवायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअॅपवर व्हर्च्युअल नंबरचा वापर करु शकता. व्हर्च्युअल नंबर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये Text Now हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. या अॅपद्वारे तुम्हाला मोफत व्हर्च्युअल नंबर मिळेल. तुम्ही या नंबरद्वारे कॉल्स किंवा मेसेजेसही करु शकता.

2. फेक व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट

जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अनोळखी नंबरवरुन मेसेज आला असेल आणि त्या नंबरची सुरुवात +91 ऐवजी दुसऱ्या कोणत्याही अंकाने (उदा. +1) सुरु होत असेल, तर समजून जा की तो फेक नंबर आहे. हा मेसेज दुसऱ्या कुठल्यातरी देशातून आलेला आहे. अशा परिस्थितीत ते अकाऊंट फेक असू शकतं. त्यामुळे तुम्ही तो मेसेज उघडून ना पाहिलेलं बरं.

3. तुमचे मेसेजेस दुसरं कोणी पाहात नाहीए ना?

अनेकदा असं होतं की आपण आपल्या ऑफिसमधील किंवा आपल्या मोबाईल व्यतिरिक्त दुसऱ्या डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप ओपन करतो आणि ते लॉग आऊट करणं विसरुन जातो. अशा परिस्थितीत तुम्ही व्हॉट्सअॅप वेबद्वारे जाणून घेऊ शकता की, तुमचं अकाऊंट इतर कुठे ओपन राहिलेलं नाहीये ना. त्यासाठी तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन QR कोडचा वापर करु शकता.

4. इयरफोनशिवाय वॉकी-टॉकीप्रमाणे ऑडियो मेसेज ऐका

जर तुम्हाला कोणी व्हॉट्सअॅपवर व्हॉईस मेसेज पाठवला तर तो मेसेज ऐकण्यासाठी तुम्हाला इअरफोनची आवश्यकता नाही. केवळ प्ले बटणवर क्लिक करुन तुम्ही एखाद्या कॉलप्रमाणे तो मेसेज ऐकू शकता. मेसेज प्ले करुन ऐकाल तर स्पीकर नव्हे तर इयरपीसद्वारे तुम्ही मेसेज ऐकू शकाल. वॉकी टॉकीप्रमाणे तुम्ही हा मेसेज ऐकू शकाल. (आपण गर्दीत, लोकांमध्ये ऑफिसमध्ये असल्यावर काही मेसेजेस आपण स्पीकरवर ऐकू शकत नाही अशावेळी इयरपीसद्वारे मेसेज ऐकता येईल, त्यासाठी इअरफोन अथवा हेडफोन्सची गरज नाही)

5. व्हॉट्सअ‍ॅपवर लँडलाईन नंबर रजिस्टर करा

व्हॉट्सअॅपवर लँडलाईन नंबर रजिस्टर करता येईल. हा नंबर नॉर्मल व्हॉट्सअॅपमध्ये वापरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला बिझनेस अकाऊंट डाऊनलोड करावं लागेल.

संबंधित बातम्या

व्हॉट्सअ‍ॅपवर नंबर सेव्ह करणं झालं सोपं, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

येत्या 1 जानेवारीपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?

तुम्ही व्हॉटसअ‍ॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

WhatsApp वरुन आरोग्य विमा खरेदीही शक्य, काय आहे योजना?

(5 Amazing features of whatsapp will solve your many problems)

Non Stop LIVE Update
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?.