सकाळी उठताच पिवळी लघवी होणे कोणत्या आजाराचे संकेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

लघवीचा रंग थेट आपल्या आहाराशी, पाण्याच्या सेवनाशी आणि आरोग्याशी संबंधित असतो. जर कधीकधी लघवीचा रंग पिवळा होत असेल तर त्यामागील नक्की कारणे काय? किंवा ते कोणत्या आजाराची लक्षणे असू शकतात? जाणून घेऊयात.

सकाळी उठताच पिवळी लघवी होणे कोणत्या आजाराचे संकेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Yellow Urine in the Morning
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 09, 2025 | 6:28 PM

बऱ्याचदा, सकाळी उठताच अनेकांनी प्रेशरने लघवीला येते. त्याची कारणे म्हणजे रात्रभर झालेली चयापचयाची प्रक्रिया. त्यामुळे शरीर हे लघवी आणि विष्ठेवाटे ती घाण शरीराच्या बाहेर काढत असतं. पण तुम्ही कधी हे लक्षात घेतलं आहे का की कधी कधी सकाळी उठल्यावर जेव्हा लघवी होते तेव्हा काहीजणांचा लघवीचा रंग हलका पिवळा ते गडद पिवळा दिसतो. बहुतेक लोक याला सामान्य मानून त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु ते शरीराच्या आत सुरू असलेल्या काही प्रक्रियांचे लक्षण असू शकते.

…तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

लघवीचा रंग शरीरात असलेल्या पाण्याचे प्रमाण, अन्न, औषधे आणि आरोग्याशी संबंधित परिस्थितींवर अवलंबून असतो. जर लघवीचा रंग हा सकाळी कधीतरी किंवा कोणत्या औषधामुळे दिसत असेल तर काळजी करण्याची गरज नाही, परंतु जर ते दररोज होत असेल आणि त्यासोबत जळजळ, दुर्गंधी किंवा इतर कोणतीही लक्षणे देखील दिसून येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे तुमच्या शरीरात जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असल्याचे किंवा संसर्ग, डिहाइड्रेशन याचे संकेत असू शकतात.

काहीवेळेला शरीर रात्रभर पाण्याशिवाय राहते.

सकाळी लघवीचा रंग पिवळा असू दिसतो कारण काहीवेळेला शरीर रात्रभर पाण्याशिवाय राहते. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा लघवीचा रंग आणखी गडद पिवळा दिसतो. कधीकधी व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, विशेषतः व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स घेतल्याने देखील लघवी पिवळी होऊ शकते. डिहायड्रेशन व्यतिरिक्त, हे शरीरात काही संसर्ग किंवा किडनीशी संबंधित समस्या उद्धवत असल्याचे लक्षण असू शकते. पण दरवेळी पिवळी लघवी हे कोणत्याना कोणत्या आजाराचे लक्षण असणे आवश्यक नाही, परंतु जर ही परिस्थिती बराच काळ तशीच दिसत असेल तर त्याची तपासणी नक्कीच करून घ्यावी.

हे कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

सफदरजंग रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे डॉ. सुभाष जैन स्पष्ट यांनी याबद्दल सांगितलं आहे की, सतत पिवळा किंवा गडद लघवी होणे हे अनेक आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते. सर्वात सामान्य कारण म्हणजे डिहायड्रेशन. याशिवाय, ते यूटीआय म्हणजेच मूत्रमार्गाचा संसर्ग, कावीळ किंवा मूत्रपिंडाच्या समस्या किंवा मग किडनीचे आजार देखील असू शकते. जर लघवीसोबत तीव्र वास, जळजळ किंवा फेस येत असेल तर ही संसर्गाची लक्षणे असू शकतात.

काही प्रकरणांमध्ये, मधुमेह किंवा प्रोस्टेट ग्लँडची समस्या देखील लघवीच्या रंगावर परिणाम करू शकते. याशिवाय, गर्भवती महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे लघवी पिवळी दिसू शकते. जर लघवीचा रंग सतत बदलत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे ठरते.

यासाठी काय करावं?

दररोज 7 ते 8 ग्लास पाणी प्या.

जास्त व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेऊ नका; ते फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या.

सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी प्या.

जास्त मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.

जर जळजळ होत असेल, वेदना होत असतील किंवा लघवीचा रंग बदलत असेल तर ताबडतोब तपासणी करून घ्या.

स्वच्छतेची काळजी घ्या.

वेळोवेळी आरोग्य तपासणी करत रहा.