पावसाळ्यात डोकं सारखं करकर खाजतंय ? हे तेल सोडवेल तुमचा त्रास
पावसाळ्यात वातावरणातील ओलाव्यामुळे केस गळती तर सुरू होतेच पण त्यासह डोक्यात , टाळूवर खाज सुटण्याची समस्याही सुरू होते. अशा वेळी काही उपायांनी आराम मिळू शकतो.

Monsoon Hair Care : पावसाळ्यात गारवा येतोच पण त्यासोबत अनेक आजारही (monsoon) येतात. त्यामुळे या ऋतूत आपल्याला आरोग्याची तसेच खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्यावी लागते. मात्र त्यासोबतच आपल्या केसांचीही (hair care) जास्त काळजी घेणेही गरजेचे असते. पावसाच्या पाण्याच हवेतील प्रदूषण आणि विषारी घटकही असतात. अशा पाण्यात आपण भिजलो तर आपल्या केसांचे (hair damage) बरेच नुकसान होते.
यामुळेच पावसात भिजणे शक्यतो टाळावे. काही कारणाने भिजलातच तर केस लवकरात लवकर स्वच्छ पाण्याने धुवून वाळवावेत. केस गळतीची समस्याही इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात जास्त दिसून येते. त्यासोबतच जाणवणारा दुसरा त्रास म्हणजे डोक्यात किंवा टाळूला सुटणारी खाज. जे त्रासदायक तर असतेच पण त्यामुळे काहीवेळेस लाजिरवाणी परिस्थिती देखील उद्भवू शकते. हा त्रास कमी करण्यासाठी एका तेलाचा वापर करणे अतिशय फायदेशीर ठरते, ते म्हणजे जोजोबा ऑईल. जोजोबा ऑईल हे टाळूची खाज दूर करण्यास मदत करते, तसेच हे तेल केसांचे सौंदर्य देखील वाढवते.
कोणत्या समस्यांसाठी फायदेशीर ठरते जोजोबा ऑईल ?
स्काल्प हायड्रेटेड राहतो
डोक्याला खाज येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्काल्प किंवा टाळूचा कोरडेपणा. ही समस्या दूर करण्यासाठी जोजोबा ऑईलचा वापर करा. हे तेल सेबम संतुलित करते, ज्यामुळे टाळू किंवा स्काल्प मॉयश्चराइझ राहते आणि त्यामुळे केस जास्त काळ हायड्रेटेड राहतात.
सूज कमी करते
जोजोबा ऑईलमध्ये सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात, जे स्काल्पची सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्यामध्ये ओमेगा -6 फॅटी ॲसिड आणि ओमेगा -9 फॅटी ॲसिड असते. तसेच हे तेल व्हिटॅमिन ई चाही उत्तम स्त्रोत आहे, ज्यामुळे स्काल्प हेल्दी राहतो.
इन्फेक्शनपासून वाचवतो
जोजोबा ऑईलमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे स्काल्पची खाज दूर होते. तसेच संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
कसा करावा वापर ?
जोजोबा ऑईल वापरण्यापूर्वी थोडं कोमट करून घ्यावं. त्यानंतर ते स्काल्पवर लावून चांगला मसाज करावा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईलही मिक्स करू शकता. या तेलाने टाळूला हलक्या हातांनी मसाज करा आणि २ ते ३ तासांनी केस धुवा. यामुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)