AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs KKR : दिल्लीच्या 142 धावा, घरच्या मैदानात कोलकाताला विजयापासून रोखणार?

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders 1st Innings Highlights : आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत क्रिकेट चाहत्यांनी सहज 200 पार मजल मारली आहे. मात्र 51 व्या सामन्यात दिल्लीला 150 पारही पोहचता आलं नाही.

DC vs KKR : दिल्लीच्या 142 धावा, घरच्या मैदानात कोलकाताला विजयापासून रोखणार?
Pathum Nissanka DC vs KKRImage Credit source: IPL X Account
| Updated on: May 08, 2026 | 10:28 PM
Share

दिल्ली कॅपिट्ल्सला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 51 व्या सामन्यात घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्ससमोर 150 धावाही करता आल्या नाहीत. केकेआरने दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 8 झटके देत 142 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. त्यामुळे आता कोलकाता नाईट रायडर्स नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये 143 धावा करुन 2 गुणांची कमाई करणार की डीसी 142 रन्सचा यशस्वी बचाव करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र दिल्लीच्या फलंदाजांना या संधीचा फायदा घेऊन मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीसाठी फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. दिल्लीसाठी ओपनर पाथुम निसांका याने सर्वाधिक धावा केल्या. पाथुमने 29 बॉलमध्ये 50 धावा केल्या. पाथुमने 172.41 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. पाथुमने या दरम्यान 3 षटकार आणि 5 चौकार लगावले.

केएल राहुल याने 14 चेंडूत 164.29 च्या स्ट्राईक रेटने 23 धावा केल्या. केएलने या 23 पैकी 16 धावा या चौकारांच्या मदतीने केल्या. केएलने 4 चौकार लगावले. तर अखेरच्या क्षणी आशुतोष शर्मा याने निर्णायक खेळी केली. त्यामुळे दिल्लीला केकेआरसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. आशुतोषने 28 बॉलमध्ये 139.29 च्या स्ट्राईक रेटने 39 धावा जोडल्या. आशुतोषने या खेळीत 3 सिक्स आणि 3 फोर लगावले. तर इतर 5 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

नितीश राणा 8, समीर रिझवी 3, ट्रिस्टन स्टब्स याने 2 तर विपराज निगम याने नाबाद 3 धावा केल्या. तर मिचेल स्टार्क याला भोपळाही फोडता आला नाही. तर लुंगी एन्गिडी याने 1 धाव जोडली. केकेआरकडून 6 पैकी 5 गोलंदाजांनी विकेट मिळवली. अनुकूल रॉय आणि कार्तिक त्यागी या दोघांनी सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर वैभव अरोरा, सुनील नारायण आणि कॅमरुन ग्रीन या तिघांनी दिल्लीच्या प्रत्येकी 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

लाईव्ह स्कोअरकार्ड

दिल्ली जिंकणार?

दरम्यान दिल्ली जिंकणार का? असा प्रश्न केकेआरला 143 धावांचं लक्ष्य दिल्यानंतर उपस्थित केला जात आहे. दिल्लीने याआधी 3 वेळा 150 आणि त्यापेक्षा कमी धावांचा यशस्वी बचाव केला आहे. दिल्लीने 2023 साली गुजरात टायटन्स विरुद्ध 130 रन्सचा बचाव केला होता. तसेच त्याच वर्षी दिल्लीने हैदराबाद विरुद्ध 144 रन्सचा बचाव केला होता. तर 2009 साली राजस्थान रॉयल्स विरुद्ध 150 धावा करुनही दिल्ली विजयी झाली होती. त्यामुळे दिल्लीच्या चाहत्यांना टीमकडून अशाच कामगिरीची आशा आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत