AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL: बीसीसीआयचा आयपीएल स्पर्धेसाठी मेगा प्लान, सामन्यांची संख्या वाढणार आणि काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र बीसीसीआयच्या डोक्यात पुढचा प्लान शिजत आहे. 2028 आयपीएल स्पर्धेचं रूप पालटण्यासाठी आतापासून तयारी सुरू झाली आहे. म्हणजेच पुढचं पर्व आहे तसंच होईल. पण त्याच्या पुढच्या पर्वात बराच बदल झालेला असेल.

IPL: बीसीसीआयचा आयपीएल स्पर्धेसाठी मेगा प्लान, सामन्यांची संख्या वाढणार आणि काय ते जाणून घ्या
IPL: बीसीसीआयचा आयपीएल स्पर्धेसाठी मेगा प्लान, सामन्यांची संख्या वाढणार आणि काय ते जाणून घ्याImage Credit source: Getty Images
| Updated on: May 08, 2026 | 10:02 PM
Share

आयपीएल ही जगभरातील मोठी आणि श्रीमंत लीगपैकी एक आहे. आयपीएल स्पर्धेचं यंदा 19वं पर्व सुरू आहे. तर पुढच्या 20वं पर्व असणार आहे. मात्र बीसीसीआयने 21व्या पर्वासाठी आतापासूनच तयारी करण्यास सुरूवात केली आहे. कारण हे पर्व खास असणार आहे. या स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर स्पर्धेचं स्वरूपही बदललेलं असणार आहे. इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, आयपीएल सामन्याची संख्या वाढवण्याचा विचार केला जात आहे. आयपीएल 2028 म्हणजेच 21व्या पर्वात सामन्यांची संख्या 74 वरून 94 होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ही स्पर्धा डबल राउंड रॉबिन फॉर्मेटमध्ये खेळली जाईल. प्रत्येक संघाचा एकमेकांशी दोनदा आमनासामना होईल. जेव्हा स्पर्धेत आठ संघ होते तेव्हाही प्रत्येक संघ डबल राउंड रॉबिन फॉर्मेटमध्ये खेळत होते.

आयपीएल 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या संघांचा समावेश झाला. त्यानंतर संघांची संख्या ही 10 झाली. 74 सामन्यात प्रत्येक संघाच्या वाटेला 14 साने आले आहे. मात्र भविष्यात ही संख्या 94 वर गेली तर प्रत्येक संघाला 18 सामने खेळावे लागतील. म्हणजेच प्रत्येक संघासोबत दोन सामने होतील. सध्या आयपीएल स्पर्धा 60 ते 65 दिवसात संपून जाते. मात्र सामन्यांची संख्या वाढली तर एक पर्व अडीच महिन्यांपर्यंत चाले. आयपीएल 2027 पर्यंत सर्व द्विपक्षीय मालिकांचं वेळापत्रक ठरलं आहे. त्यानंतर आयपीएल स्पर्धेचा अवधी वाढवली जाऊ शकते, असं अरूण सिंह धूमल यांनी सांगितलं.

आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्याकडे कूच करत असताना प्रेक्षक संख्येत कमालीची घट झाली आहे. इतकंच काय तर गुणतालिकेतील समीकरणही कंटाळवाणं झालं आहे. हे सर्व गणित पाहता, नव्या फॉर्मेटमध्ये डबल राउंड रॉबिन फॉर्मेट येईल. त्यामुळे गुणतालिका फुटबॉल लीग सारखी तयार केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, या स्पर्धेसाठी संघांची संख्या ही 10 असणार आहे. म्हणजेच यापूर्वी दोन नव्या संघांची भर पडेल असं बोललं जात होते, त्याला पूर्णविराम लागला आहे. कारण अडीच महिन्यात 12 संघाचं वेळापत्रक बसवणं कठीण जाईल.

Follow Us
षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
Eknath Shinde | षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...
Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ