प्रदुषण आणि धुळीमुळे केस दुतोंडी झालेत असं वाटतंय? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण व त्यावरील उपाय
आजकाल अनहेल्दी जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींचा केसांवर परिणाम होत आहे. यामुळे केस गळण्यापासून ते केस दुतोंडीपर्यंतच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा दुतोंडी केसांपासून सुटका मिळवायची असेल तर हे खास टिप्स फॉलो करा. चला याबद्दल जाणून घेऊयात.

आजकाल प्रत्येकजण केसांची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले महागडे केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करतात. त्यासोबतच वातावरणातील धुळ, प्रदुषण यामुळे केस आणखीन निस्तेज आणि निर्जीव होतात. त्याचप्रमाणे केसांना पुरेसं पोषण आणि ओलावा न मिळाल्याने दुतोंडी केसांची समस्या उद्भवू शकते. विशेषतः महिलांना या दुतोंडी केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळेस जेव्ह ही समस्या निर्माण होते तेव्हा अनेकजण महागडे शॅम्पू आणि कंडिशनर वापरूनही केसांच्या स्थितीत सुधारण्याच्या पर्यंत करतात मात्र खास असा परिणाम दिसत नाही. काही लोकांना वाटते की केवळ धूळ आणि सूर्यप्रकाशामुळेच केस दुतोंडी होतात. पण तसे नाही… यामागे इतरही अनेक कारणे आहेत.
आपल्याला आपल्या समस्येची अनेकदा जाणीव नसते, ज्यामुळे चुकीची हेअर केअर प्रोडक्ट वापरली जाऊ शकतात आणि फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. म्हणून केवळ बाह्य कारणेच नव्हे, तर आपल्या स्वतःच्या सवयी आणि केसांची काळजी घेण्याच्या चुकीच्या पद्धती समजून घेणे महत्त्वाचे आहे. योग्य माहिती आणि काही सोप्या उपायांनी दुतोंडी केसांच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येते आणि केसांचे आरोग्य व मजबुती परत मिळवता येते. चला तर मग आजच्या लेखात आपण दुतोंडी केस होण्याचे नेमकं कारण आणि खास उपाय जाणून घेऊयात.
हार्मोनल असंतुलन असणे
हार्मोन्सचे असंतुलन हे केसांच्या समस्यांचे एक कारण आहे. जेव्हा शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, जसे की थायरॉईडच्या समस्या, पीसीओएस (PCOS) किंवा गर्भधारणेदरम्यान, तेव्हा त्याचा थेट परिणाम केसांच्या वाढीच्या चक्रावर होतो. केस वेळेपूर्वीच कमकुवत होऊ लागतात, त्यांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि ते पातळ व निर्जीव दिसू लागतात. अशा केसांची टोके सहज तुटतात, ज्यामुळे दुतोंडी केसांची समस्या उद्भवतात.
पोषक तत्वांची कमतरता
ज्याप्रमाणे निरोगी त्वचेसाठी पोषण आवश्यक आहे, त्याचप्रमाणे केसांच्या आरोग्यासाठीही ते अत्यंत महत्त्वाचे आहे. केस मजबूत ठेवण्यासाठी शरीराला लोह, बायोटिन, व्हिटॅमिन डी, प्रथिने आणि झिंक यांसारख्या पोषक तत्वांची गरज असते. परंतु, जेव्हा या पोषक तत्वांची कमतरता असते, तेव्हा केस तुटू शकतात. तसेच केस दुतोंडी होतात.
डिहायड्रेशन
डिहायड्रेशनमुळे केवळ शरीरालाच नाही, तर केसांनाही नुकसान पोहोचते. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते, तेव्हा केसांना आवश्यक ओलावा आणि पोषण मिळत नाही. यामुळे केस कोरडे, फ्रिजी आणि कमकुवत होतात ज्यामुळे सहज तुटतात आणि दुतोंडी केस होतात.
तणाव हे देखील एक मुख्य कारण
तणावाचा तुमच्या संपूर्ण शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. तणावामुळे होणारे हार्मोनल बदल केसांच्या वाढीवर थेट परिणाम करतात. यामुळे केस गळू शकतात, केस कमकुवत होऊ शकतात.
चुकीच्या पद्धतीने केस विंचरणे
ओले केस सर्वात नाजूक असतात आणि तुम्ही जेव्हा केस धुतल्यानंतर त्यांना जोरात विंचरल्याने किंवा गुंता काढल्याने केसांवर अतिरिक्त दाब येतो. यामुळे केस तुटतात ज्यामुळे दुतोंडी केसांची समस्या निर्माण होतात. वारंवार असे केल्याने केसांची गुणवत्ता खालावू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)