AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागा बिनविरोध, जाणून घ्या सर्व अपडेट..

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात आज विधान परिषद निवडणुकीचीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 22 जून रोजी मतमोजणी होईल. 11 जागांकरिता मतदान प्रक्रियेला सुरूवात होईल. 6 जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या आहेत.

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागा बिनविरोध, जाणून घ्या सर्व अपडेट..
Vidhan Parishad Election
| Updated on: Jun 18, 2026 | 7:45 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे बघायला मिळाले. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर देण्यात आला. अनेक उमेदवारांची समजूत काढून अर्ज मागे घेण्यास लावण्यात आले. बिनविरोध निवडणुकीसाठी महायुतीने कस लावली. विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. 6 ठिकाणी अगोदरच बिनविरोध निवडणूक झाली. त्यामुळे आज 11 ठिकाणीच मतदान होईल. मतमोजणी 22 जूनला होईल, त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. या विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा नाशिक विधान परिषदेची झाली. गित्ते बंधुंनी महायुतीच्या बड्या नेत्यांना कामाला लावले. मात्र, गित्ते बंधु आपल्या बंडखोरीवर कायम होते. अखेर गिरीष महाजन आणि उदय सामंत यांना गितेंची नाराजी दूर करण्यात यश मिळाले.

जळगाव, सोलापूर, सांगली-सातारा, नागपूर, नांदेड, परभणी-हिंगोली, भंडारा-गोदिंया, अमरावती, नाशिक, धाराशिव-बीड-लातूर, छत्रपती संभाजीनगर-जालना, अमरावती, येथे आज विधान परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडेल. ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, पुणे, अहिल्यानगर, वर्धा या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. महायुतीने मोठा पैसा देऊन निवडणूका बिनविरोध केल्याचा गंभीर आरोप महाआघाडीकडून करण्यात आला.

संजय राऊत यांनी यावर गंभीर आरोप केले. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका करण्यात महाआघाडीला यश मिळाले. या निवडणुकीचा निकाल 22 जूनला लागणार आहे. 22 तारखेला दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीकडूनही या निवडणुकीचा जोरदार प्रचार करण्यात आला. सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महायुतीकडून भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध महाविकास आघाडीचे वसंत देशमुख यांच्यात लढत आहे.

मतदानासाठी एकूण 6 मतदान केंद्र असणार आहेत. त्याचबरोबर या निवडणुकीसाठी एकूण 616 मतदार असून त्यापैकी 615 जण मतदान करणार आहेत. एका मतदाराचा मृत्यू झाल्याने ते मतदान कमी झालेय. आज सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. काही वेळातच परभणी हिंगोली विधान परिषदच्या मतदानासाठी होणार सुरुवात होईल. एकूण सात मतदान केंद्रावर 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परभणी हिंगोली विधान परिषद च्या निवडणुकीत तिरंगी लढत.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं