AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिंडोरी लोकसभा : भुजबळ पिता-पुत्रांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी?

नाशिक : लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 मतदारसंघांचा आढावा घेत आहे. आता नंबर आहे नाशिक जिल्ह्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ दिंडोरीचा.. दिंडोरी हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. गेल्या तीन टर्मपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. मात्र आदिवासी बांधवांच्या समस्या कायम आहेत. 2014 ला मोदी लाटेत भाजपचे हरीश्चंद्र चव्हाण निवडून […]

दिंडोरी लोकसभा : भुजबळ पिता-पुत्रांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

नाशिक : लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 मतदारसंघांचा आढावा घेत आहे. आता नंबर आहे नाशिक जिल्ह्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ दिंडोरीचा.. दिंडोरी हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. गेल्या तीन टर्मपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. मात्र आदिवासी बांधवांच्या समस्या कायम आहेत. 2014 ला मोदी लाटेत भाजपचे हरीश्चंद्र चव्हाण निवडून आले. पण यावेळी दिंडोरी मतदारसंघात नवी समीकरणं पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांचा येवला आणि त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळांचा नांदगाव विधानसभा मतदारसंघ दिंडोरीतच येतो. यावेळी इथे नव्या समीकरणाची चर्चा आहे.

मतदारसंघातील कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी सरकारवर नाराज आहेत. अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही, तर अनेकांना नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही. मतदारसंघात रस्त्याची समस्या कायम आहे. अनेक भागात आजही खडतर रस्ते आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर असल्याने तरुण वर्ग व्यसनाधीन होत आहे. मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प अथवा उद्योग आलेला नाही. काही दिवसांपूर्वी खासदारांच्या परिवारातील लोकांकडून कार्यकर्त्यांना धमकवण्याचे प्रकार समोर आल्याने नाराजी होती. थोडक्यात रस्ते, वीज,  बेरोजगारी आणि पाणी या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत.

एकीकडे खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांच्याबाबत नाराजी आहे, तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि माकप अशा नव्या समीकरणांची शक्यता आहे. असं झाल्यास माकपचे जे. पी. गावित यांना इथे संधी मिळू शकते. असं झाल्यास आदिवासी बहुल भागातील मतदान विभागलं जाऊ शकतं आणि याचा थेट फटका भाजपला बसू शकतो.

लोकसभा 2014 मध्ये प्रथम मताची आकडेवारी

हरीश्चंद्र चव्हाण -भाजप – 5 लाख 42 हजार मते

भारती पवार – राष्ट्रवादी काँग्रेस -2 लाख 97 हजार मते

वाघेरे – माकप – 73 हजार

दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधील विधानसभा मतदारसंघ

दिंडोरी- नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी

निफाड – अनिल कदम, शिवसेना

येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी

नांदगाव – पंकज भुजबळ, राष्ट्रवादी

कळवण – जे.पी गावित, माकप

चांदवड – राहुल आहेर, भाजप

युतीचा परिणाम काय?

शिवसेना आणि भाजप युतीचा इथे फायदा होईल. कारण, युतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे. त्यामुळे शिवसेनेचा हातभार लागल्यास भाजप उमेदवाराला त्याचा फायदा होईल. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने माकपला पाठिंबा दिल्यास आदिवासी मतं विभागली जाऊ शकतात. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांचा विधानसभा मतदारसंघही दिंडोरीमध्येच आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.