पुण्यातील बुधवार पेठेत ११ बांगलादेशी महिलांना अटक, नकली आधारकार्ड आणि रेशनिंग कार्डाआधारे रहिवास

पुण्यातील बुधवार पेठेत ११ बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसाय करताना अटक करण्यात आली आहे. या महिला नकली कागदपत्रांद्वारे गेल्या अनेक महिन्यांपासून येथे राहात होत्या. पुण्यातील बुधवार पेठेत ११ बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसाय करताना अटक करण्यात आली आहे. या महिला नकली कागदपत्रांद्वारे गेल्या अनेक महिन्यांपासून येथे राहात होत्या.

पुण्यातील बुधवार पेठेत ११ बांगलादेशी महिलांना अटक, नकली आधारकार्ड आणि रेशनिंग कार्डाआधारे रहिवास
pune crime
| Updated on: Feb 18, 2026 | 8:48 PM

पुणे येथील बुधवार पेठेतून बुधवारी ११ बांग्लादेशी महिलांना पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.या बांगलादेशी महिला फेक आधारकार्ड आणि रेशनिंग कार्डच्या आधारे येथे रहात असून शरीरविक्रय करीत असल्याचे उघडकीस आले आहे. बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा सध्या गाजत असताना अशा प्रकारे बांगलादेशी महिलांवर कारवाई झाल्याने गोंधळ उडाला आहे.

या भागात बांगलादेशी महिला वेश्या व्यवसाय करत असतात अशी माहिती मिळाली होती. त्याआधारे बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातून या ११ बांगलादेशी महिलांवर कारवाई झाल्याचे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावळे यांनी सांगितले. आम्ही एकूण २२ महिलांवर कारवाई केली त्यातील ११ महिला या बांगलादेशी असल्याचे उघडकीस आले आहे. या महिला काही महिन्यांपासून शहरात बेकायदेशीरपणे रहात होत्या हे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

अमितेश कुमार यांनी घेतला आढावा

पुण्यातील बांग्लादेशी नागरिकांवरील ही कारवाई झाल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. खडक पोलीसांनी ११ बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. सातत्याने बांग्लादेशी महिला सापडत असल्याने आज स्वतः पोलीस आयुक्त फरसखाना पोलीस ठाण्यात दाखल झाले. अमितेश कुमार यांनी येथे कारवाईचा आढावा घेतला.

रात्री सर्च मोहीम

पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत रात्री सर्च मोहीम घेतली. फरासखाना पोलीस स्थानकाच्या हद्दीत खडक पोलिसांची ही कारवाई केली आहे. पोलिसांनी बुधवार पेठेतून ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. या सर्व महिला बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत होत्या. या सर्व महिलांना ताब्यात घेतले असून आता त्यांना मायदेशी पाठवण्यासंदर्भात पुढील कारवाई सुरूअसल्याची पोलिसांनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us