असं दुख: कुणाच्याच वाट्याला येवू नये; शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर फोन पे वर 1500 रुपये घेतले

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांकडून 1500 रुपये घेतले. पैशांची जुळवाजुळव करुन कुटुंबियांनी पैसे दिले. यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

असं दुख: कुणाच्याच वाट्याला येवू नये; शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर फोन पे वर 1500 रुपये घेतले
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 11:37 PM

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरु आहेच. ऐन दिवाळीत आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मात्र, या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना आणखी एका धक्कादायक आणि हतबल करणाऱ्या समस्येचा सामना करावा लागला. या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांकडून 1500 रुपये घेतले. पैशांची जुळवाजुळव करुन कुटुंबियांनी पैसे दिले. यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

कारी येथील लक्ष्मण वाघे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या कुटुंबाने पैसे नसल्याने दिवाळी साजरी केली नाही. याच नैराश्यातून वाघे यांनी आपले जीवन संपवले.

लक्ष्मण यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृत देहाचे शव विच्छेदन करण्यासाठी पांगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारा खासगी व्यक्ती बगाडे याने 2500 रुपयांची मागणी केली. मात्र, पैसे नसल्याने लक्ष्मण यांच्या कुटुंबियांनी सांगीतले. अखेरीस या व्यक्तीने 1500 रुपये फोन पे वर स्वीकारले.

पैसे मिळाल्यानंतर मृतदेह ताब्यात दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मढ्याच्या टाळुवर लोणी खाने हे नेमके काय याचा प्रत्यय इथे आला आहे. ही बाब गंभीर असून या नातेवाईक यांनी त्यांची आपबिती tv9 समोर मांडली.

Non Stop LIVE Update
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.