AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती एक चूक नडली आणि 2 विद्यार्थ्यांचा गेला जीव, खाडीत पोहोण्यासाठी उतरले आणि थेट… मुंबईत धक्कादायक प्रकार..

मुंबईच्या दहिसर परिसरात धक्कादायक घटना घडली. ज्याने सर्वांचीच झोप उडाली. केतकीपाडा परिसरातील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे खदानीत उतरण्यापूर्वी यांनी दारू पिल्याचीही माहिती पुढे येतंय.

ती एक चूक नडली आणि 2 विद्यार्थ्यांचा गेला जीव, खाडीत पोहोण्यासाठी उतरले आणि थेट... मुंबईत धक्कादायक प्रकार..
Mumbai shocking incident
| Updated on: Jul 11, 2026 | 1:16 PM
Share

मुंबईतील दहिसर पूर्व येथील केतकीपाडा परिसरातील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थ्यांची नावे पीयूष गुप्ता (वय 19, कांदिवली) आणि ओम अंकुश सिंह (वय19, अंधेरी) अशी आहेत. त्यांच्यासोबत अमन गिरी आणि दिवेश पटेल हे दोघेही पोहोण्यासाठी गेले होते. वारंवार प्रशासनाकडून या ठिकाणी न येण्याचे आवाहन केले जाते तरी या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने मुले पोहण्याकरिता या ठिकाणी येत असतात. पाण्यात बुडून थेट मृत्यू होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चौघांनी दोन दिवसांपूर्वीच पोहण्यासाठी येथे येण्याचे नियोजन केले होते. मृत विद्यार्थ्यांपैकी एक यापूर्वीही या खदानीत आला होता आणि त्यानेच इतर तिघांना येथे आणल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, खदान परिसरात मद्यपान केल्यानंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत पोलीस अधिकृत तपास करत आहेत. दहिसर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली.

वारंवार प्रशासनाकडून या खदानीत पोहोण्यासाठी जाऊ नये, अशा सूचना दिल्या जात आहेत. तरीही या सूचनांकडे दुर्लक्ष केले जातंय. मुंबईच्या कांदिवली पश्चिममधील चारकोप तलावात बुडालेल्या 22 वर्षीय सोनू विश्वकर्मा या तरुणाचा मृतदेह 10 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या शोधकार्यानंतर अखेर सापडला आहे. अग्निशमन दल, NDRF आणि नेव्हीच्या संयुक्त पथकाने ही मोहिम राबवली.

काल सोनू विश्वकर्मा त्याच्या मित्रांसोबत चारकोप तलावात पोहायला गेला होता. सोनूने तलावाचा एक फेरा पोहून पूर्ण केला. मात्र, दुसऱ्या फेरीसाठी पाण्यात गेल्यानंतर तो परत आलाच नाही. सोनूचा तलावात उडी मारून पोहण्याचा व्हिडिओही समोर आला होता. घटनेची माहिती मिळताच आधी अग्निशमन दल आणि पोलिसांनी शोधकार्य सुरू केले होते.

त्यानंतर NDRF ची टीम दाखल झाली. मात्र, मृतदेह न सापडल्याने रात्री उशिरा नेव्हीने अखेर रात्री उशिरा झालेल्या शोधकार्यात सोनूचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, सोनूने दारू प्यायली होती. मित्रांसोबत पोहण्याची स्पर्धा ठेवण्यात आली होती. एक फेरा पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या फेरीत सोनू तलावात बुडाला. पोलिसांनी ADR नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. पावसाळ्यात मद्यपान करून पाण्यात उतरणे किती धोकादायक ठरू शकते याचे हे पुन्हा एक उदाहरण आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ