AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत आला? CM फडणवीसांनी दिली सर्वात मोठी अपडेट

Ajit Pawar Death Case : अंतिम आठवडा प्रस्तावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी अजित दादांच्या विमान अपघातावर मोठी अपडेट दिली आहे.

अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत आला? CM फडणवीसांनी दिली सर्वात मोठी अपडेट
CM Fadnavis on Ajit Pawar Plane CrashImage Credit source: Google
| Updated on: Jul 10, 2026 | 5:32 PM
Share

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अंतिम आठवडा प्रस्तावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यात राज्यातील गुन्हेगारी, नसरापूर प्रकरण, कर्जमाफी या मुद्द्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात मृत्यू प्रकरणावरही भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

दोन प्रकारे तपास सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अंतिम आठवडा प्रस्तावात दिवंगत नेते अजित पवार यांचा अपघाती मृत्यूवर चर्चा झाली. अजित पवार यांच्या संदर्भात घटना घडली, ते आपल्यातून निघून गेले. दोन प्रकारे तपास सुरु आहे, सीआयडी व एआयबी तपास करत आहे. सीबीआय का करत नाही हे अनेकांनी विचारलं. त्यांनी सांगितले की एआयबीचा रिपोर्ट महत्त्वाचा आहे, त्यानंतर तपास करणार आहे. सीआयडी तपासानुसार पायलट सुमित कपूर यांच्यावर शंका होती, त्यांचे सर्व बँक खाते तपासले, पण त्याच संशयास्पद आढळले नाही.

ब्लॅक बॉक्स मधील माहिती रिकव्हर झाली

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘जेवढे डाऊनलोड करायचे ते डॉक्युमेंट डाऊनलोड झाले आहे. ब्लॅक बॉक्स मधील सर्व माहिती घेतली आहे. एक प्रिमिलरी रिपोर्ट आला आहे, मात्र सगळा अंतिम रिपोर्ट हा जानेवारी पूर्वी येईल. अहवालासाठी तीन ते चार वर्षे लागतात, हे खरे आहे. पण केंद्र सरकारने विनंती केली आहे, म्हणून दुर्दैवाने दादांच्या पुण्यतिथी आधी हा रिपोर्ट यावा. या रिपोर्ट नंतर सीबीआय किंवा सीआयडी यांना धागेदोरे मिळतील.’

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘कुणी शंका घ्यायची गरज नाही, कर्नाटक मध्ये एफआयआर केला. पहिले दोषी कोण हे ठरवावे लागेल. एआयबीचा रिपोर्ट आल्याशिवाय ते करता येत नाही. भावना महत्त्वाची आहे, पण कायदा भावनेने चालत नाही. कोर्टात ते टिकणार नाही, चपराक बसेल. त्यामुळे रिपोर्ट येईपर्यंत आम्ही वाट पाहत आहोत.’

Follow Us