AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढेंचा दणका! 37 हॉटेल्सवर धाडी, 4 आस्थापनांचे परवाने निलंबित, संपूर्ण राज्यात खळबळ

नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवत आहे. आज 24 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 2 कोटी 25 लाख रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, चार अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

तुकाराम मुंढेंचा दणका! 37 हॉटेल्सवर धाडी, 4 आस्थापनांचे परवाने निलंबित, संपूर्ण राज्यात खळबळ
Tukaram Mundhe Raid News
| Updated on: Aug 25, 2026 | 6:44 PM
Share

नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवत आहे. आज 24 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 2 कोटी 25 लाख रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, चार अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईत नागपूरमध्ये तब्बल 55 हजार 996 किलो भाजलेल्या सुपारीचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 2 कोटी 23 लाख 98 हजार 400 रुपये आहे.

4 आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, राज्यभरात एकूण 37 हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी 31 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर 4 आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये मुंबईतील AYUB’S, फोर्ट, मेसर्स संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, कुर्ला, तसेच नागपूरमधील बुर्हामपूर जलेबी सेंटर आणि स्टेप इन रेस्टॉरंच यांचा समावेश आहे.

AYUB’S फोर्ट हॉटेलमध्ये गंभीर अन्न सुरक्षा त्रुटी

मुंबईतील फोर्ट परिसरातील AYUB’S या आस्थापनाची 22 ऑगस्ट रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्या. अन्नपदार्थांसाठी आवश्यक तापमान नियंत्रणाची सुविधा नसणे, अंडी यांसारख्या नाशवंत पदार्थांची खोलीच्या तापमानावर साठवणूक करणे, कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगळे न ठेवणे, अस्वच्छ परिसर, उघडी व अस्वच्छ गटारे, साचलेले पाणी तसेच घरमाशांची उपस्थिती आढळून आली.

याशिवाय कीटक नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये कमतरता, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक वैयक्तिक स्वच्छता सुविधांचा अभाव आणि अन्नपदार्थांच्या तपासणीसह ट्रान्सेबिलीटी नोंदींमध्ये त्रुटी आढळल्या. या गंभीर उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर AYUB’S चा FSSAI परवाना 23 ऑगस्ट 2026 पासून निलंबित करण्यात आला आहे.

कुर्ल्यातील संस्थेवरही कारवाई

मेसर्स संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, कुर्ला या आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना देखील तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 आणि त्याअंतर्गत लागू नियम व विनियमांनुसार करण्यात आली आहे.

नागपुरातील दोन आस्थापनांचे परवाने निलंबित

नागपूरमध्ये तपासणीदरम्यान स्वच्छता आणि अन्न सुरक्षा निकषांचे उल्लंघन आढळल्याने बुऱ्हामपूर जलेबी सेंटर, प्रतापनगर आणि स्टेप इन रेस्टॉरंट गिरीपेठ या दोन आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले. ही कारवाई नियमित तपासणीच्या अनुषंगाने करण्यात आलेली प्रशासकीय कारवाई असल्याचे FDAने स्पष्ट केले आहे.

Follow Us