नाशिककरांसाठी आनंदाची बातमी ! केंद्राच्या मदतीने मनपाने घेतला मोठा निर्णय

| Updated on: Oct 25, 2022 | 4:06 PM

नवी दिल्ली, मुंबई नंतर आता नाशिकमध्ये देखील केंद्र आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत प्रक्रिया राबविली जाणार आहे.

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी ! केंद्राच्या मदतीने मनपाने घेतला मोठा निर्णय
Image Credit source: Social Media
Follow us on

Nashik News : राज्याच्या सुवर्ण त्रिकोणाचा एक भाग असलेल्या नाशिकमध्ये ( Nashik ) आता लवकरच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. प्रदूषणमुक्तीला हातभार लावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन (electric vehicle charging stations ) धोरणांतर्गत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. 22 जागांवर हे स्टेशन उभारले जाणार असून महापालिकेच्या हद्दीत हे स्टेशन असणार आहे. नाशिक महानगर पालिकेला यासाठी नवी दिल्ली येथील युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम (युएनडीपी) मदत करणार आहे. एकूणच हे इलेक्ट्रिक वाहन स्टेशन उभारत पालिकेने सीएनजी आणि इलेक्ट्रिकल वाहनधारकांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणात पालिकेने हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्र नितीन गडकरी यांनी देखील वाहनधारकांनी वाहने खरेदी करताना इलेक्ट्रिकल पर्याय निवडण्याची विनंती वजा आदेश दिले होते.

नवी दिल्ली, मुंबई नंतर आता नाशिकमध्ये देखील केंद्र आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत प्रक्रिया राबविली जाणार आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीत देखील इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असुन नुकतीच त्याची पाहणी करण्यात आली असून 22 जागा निश्चित करण्यात आल्या आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाहनांचे उत्पादन कमी करण्याबरोबरच सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यावर भर द्यावा असा आदेश केंद्र सरकारने काढला होता.

त्यानुसार अनेक कंपन्यांनी डिझेल निर्मितीचे वाहन उत्पादन न करता पेट्रोल आणि सीएनजी इंधनाचे वाहन निर्मितीवर भर दिला त्यानुसार वाहन खरेदी करतांना नागरिक देखील सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहने खरेदी करीत आहे.

युएनडीपीने देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मदतीचा हात पुढे केला असून नाशिक शहरात 22 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी निधी देण्याची तयारी केली आहे.

मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन, मनपा पूर्व, पश्चिम, नवीन, नाशिकरोड, सातपूर, पंचवटी सहाही विभागीय कार्यालये, बिटको हॉस्पिटल, झाकीर हुसेन हॉस्पिटल,

कृषीनगर जॉगिंग ट्रॅक तसेच महात्मानगर क्रिकेट मैदान, फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी मार्केट, रामसृष्टी उद्यान, रामदास कॉलनी गार्डन कॉलेजरोड,

महाकवी कालिदास कला मंदिरासमोरील पार्किंग, इच्छामणी मंगल कार्यालयालगत, उपनगर, आरटीओ कॉलनीलगत बोधले नगर, लेखानगर, गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यान,

तपोवन बस डेपो, राजे संभाजी स्टेडियम या २२ जागांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणार असल्याची माहिती आहे.