टोल नाक्यावरचा निष्काळजीपणा भोवला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

मलकापूर जवळ ट्रक आणि आयशर गाडीचा भीषण अपघात होऊन त्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लकापूर जवळील तलासवाडा फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत

टोल नाक्यावरचा निष्काळजीपणा भोवला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Mar 08, 2024 | 1:22 PM

बुलढाणा | 8 मार्च 2024 : मलकापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मलकापूर जवळ ट्रक आणि आयशर गाडीचा भीषण अपघात होऊन त्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लकापूर जवळील तलासवाडा फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खानदेश विदर्भ सीमेवर तालसवाडा जवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. ट्रक आणि आयशर गाडीची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात अन्य एक जण जखमी झाला आहे. मृतांची अथवा जखमी व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेलं नाही. अपघाताचाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू केलं आहे. मात्र या अपघातामुळे विदर्भ खानदेश महामार्गावर गेल्या दोन तासांपासून वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान टोल नाक्याच्या निष्काळजीपणामुळे एकतर्फी वाहन सुरू असल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे