AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्ख्या महाराष्ट्रात ड्रग्स विकले जातायेत, तरूण-तरूणी… राज ठाकरे कडाडले; थेट आकडेवारी सांगितली!

Raj Thackeray : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ड्रग्सच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अख्ख्या महाराष्ट्रात ड्रग्स विकले जातायेत, तरूण-तरूणी... राज ठाकरे कडाडले; थेट आकडेवारी सांगितली!
Raj Thackeray Image Credit source: X
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 19, 2026 | 9:30 PM
Share

आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर पार पडला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आपल्या भाषणात त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले. राज्यातील तरुण-तरूणी ड्रग्सच्या आहारी गेल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

राज्यावरील कर्ज वाढले

राज ठाकरे यांनी म्हटले की गेल्या काही वर्षांमध्ये राज्यावरील कर्जात मोठी वाढ झाली आहे. 2014 पूर्वी राज्यावर 2 लाख कोटी कर्ज होते, मात्र त्यानंतर आतापर्यंत 11 लाख कोटी कर्ज झाले आहे. असं असलं तरी शहरे कोलमडून पडली आहेत. पिज्जा 10 मिनिटात येतो, पण सामान्य मानसाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही फुटपाथ जाम आहेत, सगळीकडे ट्रॅफिक आहे. ग्रामीण भागातील लोक शहराकडे येऊ इच्छित आहेत, मात्र शहराचे नियोजन नाही.

तरूणी-तरुणी व्यसनाधीन होत आहेत

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, मात्र संपूर्ण राज्यात ड्रग्स विकले जात आहेत. शाळांमध्ये ड्रग्स जातायेत, शाळांमध्ये ड्रग्स जातायेत. तरूणी-तरुणी व्यसनाधीन होत आहेत. काय करणार आहोत आपण महाराष्ट्राचं. ग्रामीण भागात प्रगती होत नाही, ग्रामीण भागातील मुलं-मुली शहरात येत आहेत, शहरं बकाल पडली आहेत. शहरामध्ये ड्रग्स मिळत आहेत, लहान मुली मुलं पळवली जात आहेत.

मुलं बेपत्ता होतायेत…

राज ठाकरे यांनी लहान मुलांच्या गायब होण्याची आकडेवारी सादर केली. त्यांनी म्हटले की, नोहेंबर डिसेंबरमध्ये 36 दिवसांमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली आहेत. त्याआधी जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या काळात नवी मुंबईत 499 मुलं बेपत्ता झाली होती, महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही मुले पालकांना मिळाली, मात्र त्यातील 41 मुलं बेपत्ता आहेत. NCRB च्या आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी 4500 ते 5500 मुलं बेपत्ता होतात. 2022 मध्ये 5398 आणि 2023 मध्ये 4619 मुले बेपत्ता झाली आहेत. यात मुलींचे प्रमाण जास्त आहे. मुंबईत दरवर्षी 2000 पेक्षा जास्त होतात अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी