AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र पुढचा…राज ठाकरे यांनी भरसभेत प्रकाशित केली नवीन वेबसाईट, काय आहे योजना?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील मेळाव्यात एक नवीन वेबसाईट प्रकाशित केली. या वेबसाईटमध्ये प्रत्येकाला महाराष्ट्रात काय केले जावे यासाठी स्वत:च्या संकल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र पुढचा...राज ठाकरे यांनी भरसभेत प्रकाशित केली नवीन वेबसाईट, काय आहे योजना?
Raj thackeray
| Updated on: Mar 19, 2026 | 9:58 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील मेळाव्यात एका नव्या वेबसाईटची घोषणा केली. राज ठाकरे यांनी या वेबसाईट मागची संकल्पना समजावून सांगितली. यावेळी ते म्हणाले की मी जेव्हा पहिल्या मेळाव्यात महाराष्ट्राची ब्ल्यु प्रिंट आणण्याची घोषणा केली होती. त्यावेळी २००६ नंतर मला जेथे मी जेथे – जेथे जायचो, तेथे कुत्सितपणे मला या ब्ल्यु प्रिंटबद्दल विचारले जायचे.त्यानंतर आपण साल २०१४ मध्ये ही ब्ल्यु प्रिंट आणली. मात्र, त्यानंतर या ब्ल्यु प्रिंटचे काय झाले आहे, हे कोणी मला विचारलेच नाही. कारण त्यांनी ती वाचलीच नाही. त्यांना रस केवळ मला खिजवण्यात होता. या गोष्टींला १२ वर्षे झाली. त्यानंतर आता आम्ही महाराष्ट्रासाठी एक नवीन वेबसाईट आणत आहोत असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील थोर प्रतिभावंतांची एक यादीच वाचवून दाखवली. ही भली मोठी यादी वाचून दाखवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की आपण केवळ जयंत्या आणि पुण्य तिथी आणि साजऱ्या करण्यात अडकलो आहोत. महाराष्ट्र केवळ प्रतिमांमध्ये अडकला आहे. महाराष्ट्र जेव्हा प्रतिभेमध्ये अडकेल त्यावेळी महाराष्ट्राला खरे गतवैभव प्राप्त होईल असेही ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी आपण पक्ष स्थापण केल्यानंतर येथेच आपण महाराष्ट्राची ब्ल्युप्रिंट सादर करणार आहोत असे सांगितले होते. त्यानंतर साल २००६ नंतर मी जेथे जेथे जायचो तेथे मला पत्रकार त्या ब्ल्यु प्रिंटचे काय झाले हो हे विचारायचे. त्यानंतर साल २०१४ मध्ये मी ही ब्ल्युप्रिंट आणली. त्यानंतर कोणी मला त्याबद्दल विचारलेच नाही की त्या ब्ल्यु प्रिंटमध्ये काय आहे. कारण त्यांनी ब्ल्युप्रिंट वाचलीच नव्हती.

आपण महाराष्ट्रासाठी काही करतोय का ?अख्खा देश टवकारुन पाहायचा महाराष्ट्र काय नवा विचार देतोय. एकेकाळी क्रिकेट टीममध्ये मुंबईचे किती लोक असायचे. आता किती जण आहेत. तुम्हा आम्हा सर्वांना हा भविष्यातील महाराष्ट्र घडवायचा आहे. सरकारवर अवलंबून राहायचे नाही. आता आपण महाराष्ट्रासाठी काय करायचे आहेत यासाठी आम्ही वेबसाईट आणत आहोत असे राज ठाकरे यांनी सांगितले.

यात २७ विषय यात दिलेले आहेत

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या नव्या वेबसाईटची घोषणा केली. ‘महाराष्ट्र पुढचा’ ( महाराष्ट्र नेक्स्ट ) या वेबसाईटमध्ये मराठी आणि इंग्रजी असे दोन ऑप्शन असतील. यात २७ विषय यात दिलेले आहेत. या विषयावर तुम्ही तुमच्या संकल्पना मांडू शकता. शेती, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास ,आरोग्य सेवा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जमीन, पायाभूत सुविधात व औद्योगिक वसाहती, व्यवसाय सुलभता, प्रादेशिक औद्योगिक संतुलन व सर्वसमाशेक, शालेय, उच्च व तंत्र शिक्षण सुधारणा, आदिवासी विकास, सर्वसमावेश आणि सशक्त महिला व बाल कल्याण आदी २७ विषयांवर आपली मते मांडता येणार आहे. या सर्व संकल्पनाचा व्हिडीओ आणि फोटो, चित्र पाठवता येतील. या विषयांची तज्ज्ञांकडून तपासणी करुन त्या निवडणक संकल्पना राज्य सरकारकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी