47 वर्षीय शिक्षकाचं 16 वर्षीय विद्यार्थिनीसोबत चीड येणारं कृत्य, पाठीमागून हात पकडला अन्…
शिक्षकासोबत भेटीचा वाईट अनुभव, 16 वर्षीय मुलीचा पाठीमागून हात पकडला, जबरदस्तीने मिठी मारत नको ते कृत्य, 47 वर्षीय शिक्षकाला अटक... या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

देशात आज कोणत्याच कोपऱ्या मुली सुरक्षित नाही… हे वारंवार खरं ठरत आहे. आता देखील 16 वर्षीय मुलीवर 47 वर्षीय शिक्षकाने अत्याचार केले आहे. संबंधित घटना मुंबईतील विलेपार्ले येथील पूर्व परिसरात घडली आहे. शिक्षकाचं नाव गणेश देवळूखकर असं असून त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्षकावर भारतीय न्याय संहिता आणि पोस्को (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना समोर आल्यानंतर पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
समोर येत असलेल्या माहितीनुसार, कथित आरोपी आणि पीडित मुलगी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गणेश देवळूखकर याने सर्वात आधी व्हॉट्सॲपवर मेसेज करून पीडितेला भेटण्यासाठी बोलावलं. शिक्षकांनी भेटण्यासाठी बोलावलं असता, पीडिता भेटण्यासाठी गेली. ती भेटण्यासाठी गेल्यानंतर, शिक्षकाने तिचा हात पकडून पाठीमागून ओढलं… त्यानंतर तिला जबरदस्तीने मिठी मारली आणि 16 वर्षीय मुलीचा विनयभंद केला. शिक्षकाने मुलीचा लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
घडलेल्या घटनेनंतर आरोपी शिक्षक गणेश देवळूखकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नोटीस बजावून देवळूखकर याला अटक केली आहे. आता याप्रकरणी पुढील तपास पोलीस कसून करत आहेत. आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या परिचयाचे असल्याची माहिती समोर आली आहे.
सांगायचं झालं तर, ही पहिलीच घटना नाही. रोज देशात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असतात आणि धक्कादायक बाब म्हणजे, ही संख्या दिवसागणिक वाढत आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली. तालुक्यात एका दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
त्याआधी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात 60 वर्षीय दोषी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सतत घडत असलेल्या या घटनांमुळे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून येत आहे. ही एक मोठी चिंताजनक बाब आहे.