मास्क जरूर वापराः कोरोनाचे केरळात 4972 रुग्ण, तर नाशिकमध्ये 486 जणांवर उपचार सुरू!

युरोपमधील काही देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. भारतात केरळमध्येही तब्बल 4972 रुग्ण आढळले आहेत, तर 370 जणांचा मृत्यू झाला आहे, तर नाशिकमध्ये सध्या 486 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मास्क जरूर वापराः कोरोनाचे केरळात 4972 रुग्ण, तर नाशिकमध्ये 486 जणांवर उपचार सुरू!
प्रातिनिधीक छायाचित्र


नाशिकः युरोपमधील काही देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. भारतात केरळमध्येही तब्बल 4972 रुग्ण आढळले आहेत, तर 370 जणांचा मृत्यू झाला आहे. इकडे नाशिकमध्ये सध्या 486 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा अहवाल काय?

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 2 हजार 862 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 486 रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 7 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 798 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

येथे आहेत रुग्ण?

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 55, बागलाण 5, चांदवड 20, देवळा 5, दिंडोरी 15, इगतपुरी 8, मालेगाव 4, नांदगाव 1, निफाड 63, सिन्नर 73, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 2, येवला 19 असे एकूण 272 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 187, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 11 तर जिल्ह्याबाहेरील 16 रुग्ण असून असे एकूण 486 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 56 रुग्ण आढळून आले आहेत.

का वाढलीय चिंता?

देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय, तर दुसरीकडे केरळमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. केरळमध्ये मंगळवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार 4 हजार 972 रुग्ण समोर आले आहेत. तर, 370 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात समोर आलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. सोमवारी केरळमध्ये 3698 रुग्णसंख्या आढळून आले होते. तर, मिळालेल्या माहितीनुसार केरळमध्ये आतापर्तंय 50 लाख 97 हजार 845 रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातले रुग्ण

कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 766 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, मंगळवारी 929 जणांना कोरोनामुक्त झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 64 लाख 77 हजार 379 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के आहे. महाराष्ट्रात सध्या 9 हजार 493 रुग्ण आढळले आहेत.

इतर राज्यांतली स्थिती

राजस्थानात गेल्या 24 तासांमध्ये 23 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी 18 रुग्ण जयपूरमध्ये तर 4 रुग्ण अजमेरमध्ये आढळले होते. राज्यात 136 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. राजस्थानात 8955 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ओडिशात दोन शैक्षणिक संस्थांमधील 82 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. यामध्ये मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींचा देखील सहभाग आहे. संबलपूरमधील वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च मधील 29 विद्यार्थिनींना कोरोना संसर्ग झाला आहेत. तर सुंदरगढ येथील सेंट मेरी हायस्कूलच्या 53 विद्यार्थिनींना संसर्ग झालाय.

इतर बातम्याः

नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत, मारेकऱ्यांना अटक करा म्हणत संतापलेले नागरिक रस्त्यावर!

Nashik| आनंदवल्लीमध्ये अज्ञात भुयारी मार्गाचा शोध; रस्त्याच्या शेवटी दडलंय काय, पुरातत्व विभाग काढणार माग

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI