सुरक्षा रक्षकाला धमकावत 6 अल्पवयीन मुलींचे बालसुधारगृहातून पलायन, चंद्रपूरमध्ये धक्कादायक प्रकार

चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहरात असलेल्या बालसुधारगृहातून सहा अल्पवयीन मुलींनी सुरक्षा रक्षकाला धमकावून पलायन केल्याची घटना घडली आहे.

सुरक्षा रक्षकाला धमकावत 6 अल्पवयीन मुलींचे बालसुधारगृहातून पलायन, चंद्रपूरमध्ये धक्कादायक प्रकार
बालसुधारगृहातून अल्पवयीन मुलींंच पलायन
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 6:57 PM

चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहरात असलेल्या बालसुधारगृहातून एक नाही दोन नाही तर तब्बल सहा अल्पवयीन मुलींनी पलायन केलं आहे. ही घटना समोर येताच मोठा गोंधळ उडाला.  पोलिसांनी तातडीने या मुलींचा शोध सुरू केला.  चंद्रपूर शहराच्या आसपासची रेल्वे स्थानके, बस स्टॅन्ड, मंदिरे, नदीकाठ अशा सर्वच ठिकाणी पोलिसांनी या बालसुधारगृहातून पलायन केलेल्या मुलींचा शोध घेतला. अखेर रात्री उशिरा पुन्हा एकदा या मुलींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  चंद्रपूर शहरातील बालसुधारगृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बालसुधारगृहामध्ये समुपदेशनासाठी असलेल्या एका मुलीने काचेचा ग्लास फोडून सुरक्षा रक्षकांना धमकावत आपल्यासह सहा अल्पवयीन मुलींना भिंतीवरून उडी मारून पळून जाण्यास मदत केली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने या मुलींचा शोध सुरू केला.

Loading...

यात शहर व आसपासचे 35 सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. याशिवाय सायबर शोध मोहीम आणि गोपनीय माहितीसह प्रत्यक्षदर्शींचीही मदत घेण्यात आली. तापसकामी एकूण सहा विविध पथके गठीत करण्यात आली होती. चंद्रपूर शहराच्या आसपासची रेल्वे स्थानके, बस स्टॅन्ड, मंदिरे, नदीकाठ आदी जागी या बालसुधारगृहातून पलायन केलेल्या मुलींचा शोध घेण्यात आला

शेवटी रात्री उशिरा या सहा मुली वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट रेल्वे स्टेशन जवळ असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार हिंगणघाट पोलिसांनी या मुलींना पुन्हा एकदा ताब्यात घेतले. या मुलींना ताब्यात घेतल्यानंतर  चंद्रपूर येथून दोन पोलिसांची पथके हिंगणघाटला रवाना करण्यात आले, चंद्रपूर पोलिसांनी या मुलींना आपल्या ताब्यात घेतलं.  दरम्यान अल्पवयीन मुलींनी चक्क बालसुधारगृहातून आणि ते देखील सुरक्षा रक्षकाला धमकावून पलायन केल्याने हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us