AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SCO संवाद मंचाचे PM मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकचे मंत्री भारतात येणार

शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) पहिल्या 'सिव्हिलायझेशन डायलॉग फोरम'चे (संस्कृती संवाद मंच) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. २० ते २२ नोव्हेंबर अशा तीन दिवसांच्या परिषदेनंतर पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मसूद मलिक येणार आहेत.

SCO संवाद मंचाचे PM मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकचे मंत्री भारतात येणार
pm modi
| Updated on: Nov 20, 2026 | 6:31 PM
Share

नवी दिल्ली येथील पुराणा किल्ला येथे पहिल्या ‘शांघाय सहकार्य संघटना (SCO) सभ्यता संवाद मंचा’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मसूद मलिक राजधानी नवी दिल्लीत दौऱ्यावर येणार आहेत. या परिषदेत चीन, रशिया, इराणसह पाकिस्तानचाही परिषदेत सहभाग आहे. या परिषदेचे आयोजन २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले आहे. साल २०२३ मध्ये पाकिस्तानातून बिलावल भुट्टो भारतात आले होते.

SCO सभ्यतागत संवाद मंचाच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुराणा किल्ला येथे उभारण्यात आलेल्या पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक प्रदर्शनांची पाहणी केली आहे. २० ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या तीन दिवसीय कार्यक्रमाचा भाग असलेल्या या प्रदर्शनात भारताचा पुरातत्व, कलात्मक आणि साहित्यिक वारसा मांडण्यात आला आहे.

या पुरातत्वीय आणि सांस्कृतिक प्रदर्शनात खालील गोष्टींची मांडणी

‘अस्तित्व – हमारे होने का सार’ हे प्रदर्शन: या प्रदर्शनामध्ये इ.स.पूर्व १२०० ते इ.स. १२०० या काळातील दिल्लीच्या आणि भारताच्या प्राचीन वारशाचे पुरातत्त्वीय पुरावे, उत्खननातील अवशेष, कलाकृती आणि स्थापत्यखंड

पुराणा किल्ला येथील उत्खनन स्थळाभोवती उभारलेली ही मांडणी भारताचा प्राचीन इतिहास आणि SCO देशांशी असलेले ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध दर्शवते. यामध्ये इ.स. १३२८ मधील ‘इंद्रप्रस्थ’ संदर्भातील शिलालेख, पेंटेड ग्रे वेअर (PGW) मातीची भांडी तसेच ‘अश्वमेध’ विधी व उत्खननाशी संबंधित काही पुरातत्त्वीय नमुने यांचाही समावेश

‘महाभारत स्क्रॉल पॅव्हेलियन – अनंत’ (Anant: A Rare 18th Century Mahabharata Scroll): या दालनात १८ व्या शतकातील एक दुर्मिळ चित्रित महाभारत स्क्रोल पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहे, जे भारताच्या महाकाव्य, हस्तलिखित आणि कलात्मक परंपरेचे दर्शन

मौर्यकालीन व राजपूत काळातील अवशेष: इ.स.पूर्व १२०० ते इ.स. १२०० या काळातील सातत्यपूर्ण मानवी वास्तव्याचे पुरावे मांडताना येथे मौर्य काळातील टेराकोटा (मातीच्या) मूर्ती आणि राजपूत काळातील वैकुंठ विष्णूची दगडी मूर्ती

पेंटेड ग्रे वेअर (PGW) आणि प्राचीन भांडी: प्राचीन दिल्लीच्या वसाहतींचा इतिहास उलगडणारी चित्रित राखाडी मातीची भांडी (Painted Grey Ware) आणि उत्खननातील इतर पुरातत्त्वीय नमुने

येथे पोस्ट वाचा –

Follow Us
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय