16 वर्षीय नातीसोबत आजोबांचं घाणेरडं कृत्य, डॉक्टरांकडे जाताच विदारक सत्य समोर…, आईच्या निधनानंतर मुलीचं जगणं झालेलं कठीण
70 वर्षीय आजोबांनी 16 वर्षीय नातीसोबत घाणेरडं कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. आईच्या निधनानंतर मुलीचं जगणं पूर्णपणे कठीण झालं होतं. अशात मुलीने पोटात दुखत असल्याचं सांगितलं आणि डॉक्टरांकडे जाताच एक विदारक सत्य समोर आलं आहे.

मुली खरंच त्यांच्या घरात देखील सुरक्षित नाहीत, हे नुकताच घडलेल्या एका घटनेनंतर समोर आलं आहे. 16 वर्षीय नातीवर 70 वर्षांच्या आजोबांनी अत्याचार केले आहेत. या घटनेनंतर रक्ताच्या नात्यावर देखील विश्वास ठेवायचा की नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे. नराधमावर आरोप आहेत की, तब्बल तीन महिने त्याने नातीवर अत्याचार केले आहेत. आजोबांचा खरा चेहरा तेव्हा समोर आला, जेव्हा मुलीच्या पोटात दुखू लागलं आणि डॉक्टरांकडे जाताच कळलं की, मुलगी प्रेग्नेंट आहे. त्यानंतर नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रेग्नेंट असल्याचं कळल्यानंतर सत्य समोर आलं. अखेर मुलीने जे काही घडलं, ते सर्व पोलिसांना सविस्तर सांगितलं. पोलिसांनी ओजाबांना अटक केली आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलींच्या आईचं निधन झालं आहे. मुलगी वडील आणि आजोबांसोबत राहत होती.
पीडित मुलीने पोलिसांना सांगितलं की, ती सुमारे तीन-चार महिन्यांपूर्वी नातेवाईकाच्या घरून सिकंदराराव येथे परतली होती. त्यानंतर, 20 जून रोजी तिच्या आजोबांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. बलात्कार केल्यानंतर देखील आजोबांनी तिला सोडलं नाही. जेव्हा मुलगीचे वडील कामासाठी बाहेर जायचे. तेव्हा घरात फक्त नात आणि आजोबा असायचे. अशात घरात कोणी नसताना आजोबा नातीचं लैंगिक शोषण करायचे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं मुगली अडीच महिन्यांची प्रेग्नेंट आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीचा जबाब नोंदवला. तिच्या जबाबाच्या आधारे, तिच्या 70 वर्षीय आजोबांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधिकारी अमित पाठक यांनी सांगितल्यानुसार, त्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यात ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, मुलीचा जबाब, मेडिकल रिपोर्ट आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.