भारताने जगाला दाखवली ताकद, आशिया पॉवर इंडेक्समध्ये थेट रशियालाही टाकले मागे, थेट अमेरिकेसह..
भारताने धमाकेदार कामगिरी केली आहे. भारत हा आशियातील सर्वात शक्तीशाली देशांपैकी थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यातील सर्वात विशेष बाब म्हणजे भारताने थेट जपान आणि रशियाला मागे टाकत तिसरे स्थान पटकवले आहे.

मागील काही वर्षांपासून जागतिक स्तरावर भारताचा प्रभाव वाढताना दिसत आहे. भारताने वेळोवेळी आपली ताकद दाखवून दिली. भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने आकारला होता. त्यावेळीही भारताने मार्ग काढत आपल्या अर्थव्यवस्थेतवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. आशियामध्ये भारताची शक्ती वाढली असून, आशिया पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताने तिसरे स्थान पटकावले आहे. अमेरिका आणि चीन भारताच्या पुढे आहेत. विशेष म्हणजे भारताने जपान आणि रशियासारख्या देशांना भारताने छोबीपछाड केले. आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारत अमेरिका आणि चीनला जोरदार टक्कर देत असून त्यांच्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. हा एकप्रकारे भारताचा मोठा विजय म्हणावा लागेल.
आशिया पॉवर इंडेक्स 2026 नुसार, अमेरिका आणि चीननंतर भारत आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश म्हणून समोर आला आहे. लोवी इन्स्टिट्यूटने आपल्या अधिकृत एक्स खात्यावर याबाबतची माहिती दिली आहे. जागतिक स्तरावर भारताची शक्ती वाढल्याचे यावरून स्पष्ट दिसते. या निर्देशांकात भारताचा स्कोअर 40.5 वर पोहोचला आहे. भारत आणि चीन यांच्यातील अंतर 2018 नंतरच्या सर्वात कमी पातळीवर आले आहे.
भारताने आपली शक्ती आता जगाला दाखवली आहे. अमेरिका पहिल्या स्थानी, चीन दुसऱ्या स्थानी, भारत तिसऱ्या स्थानी, जपान चाैथ्या स्थानी तर रशिया पाचव्या स्थानी आहे. लोवी इन्स्टिट्यूट ही ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्थित एक स्वतंत्र आणि तटस्थ अशी आंतरराष्ट्रीय घडामोडींवर काम करणारी विचारगट संस्था आहे.
ASIA POWER INDEX: In 2026, the top five countries for overall power in Asia are the United States, China, India, Japan and Russia. Australia remains sixth in this year’s ranking. https://t.co/qrk0mc8Z8y https://t.co/VVdHc9oo5H
— The Lowy Institute (@LowyInstitute) November 22, 2026
या संस्थेची स्थापना 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन व्यावसायिक सर फ्रँक लोवी यांनी केली होती. ही संस्था जागतिक राजकारण, परराष्ट्र धोरण, सुरक्षा,अर्थव्यवस्था आणि विविध राष्ट्रांमधील संबंधांवर संशोधन करते. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर याचे लक्ष असते. पूर्ण अभ्यास करून त्यांच्याकडून हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. यातच आता भारताने बाजी मारली. जपानला चक्क भारताने मागे टाकले. शक्तीशाली देशात भारत तिसऱ्या क्रमाकावर पोहोचला. मागील काही वर्षांचा विचार केला असता भारताने मोठी प्रगती नक्कीच केली आहे.
