AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: ना रणबीर, ना यश; ‘रामायण’मधील हा अभिनेता IMDb वर नंबर 1, तुफान चर्चा

Ramayana: रणबीर कपूर आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण' चित्रपटातील एक अभिनेता सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे हा अभिनेता IMDb च्या साप्ताहिक ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Ramayana: ना रणबीर, ना यश; 'रामायण'मधील हा अभिनेता IMDb वर नंबर 1, तुफान चर्चा
रामायण सिनेमाImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 23, 2026 | 9:41 AM
Share

Ramayana: बॉलिवूडमध्ये सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या भव्य चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांसारखे लोकप्रिय कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. मात्र, सध्या या बड्या कलाकारांपेक्षाही एका अभिनेत्याची अधिक चर्चा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा अभिनेता म्हणजे ‘पंचायत’ या लोकप्रिय वेबसीरिजमधील प्रल्हाद चाचांच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला फैसल मलिक. ‘रामायण’मध्ये त्याने कुंभकर्णाची भूमिका साकारली असून IMDb च्या साप्ताहिक ट्रेंडिंग लिस्टमध्ये त्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. या यादीत यश दुसऱ्या क्रमांकावर आहे.

IMDb च्या यादीत फैसल मलिकची बाजी

फैसल मलिकने ‘रामायण’मध्ये रावणाचा भाऊ कुंभकर्ण साकारला आहे. या भूमिकेमुळे तो सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे IMDb च्या साप्ताहिक लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत फैसल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर यश दुसऱ्या क्रमांकावर, तर चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. साई पल्लवी चौथ्या आणि रणबीर कपूर पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या यादीत ‘रामायण’मधील कलाकारांचा दबदबा पाहायला मिळत आहे.

IMDb वर ट्रेंडिंग

कुंभकर्णाची भूमिका साकारण्यासाठी अभिनयाचे धडे पुन्हा गिरवले

फैसल मलिकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘रामायण’मधील कामाचा अनुभव सांगितला. त्याच्या मते, हा चित्रपट सामान्य पद्धतीने अभिनय करण्यासारखा नाही. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्स तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे त्याला अभिनयाच्या पारंपरिक पद्धती विसराव्या लागल्या. या भूमिकेसाठी चित्रपटाच्या टीमकडून विशेष प्रशिक्षणही देण्यात आलं होतं. कुंभकर्णासारख्या विशालकाय पात्रासाठी शरीराच्या हालचाली, चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांच्या हालचाली यावर विशेष लक्ष द्यावं लागलं, असं त्याने सांगितलं.

यशसोबत काम करण्याचा अनुभव खास

चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशसोबत काम करण्याचा अनुभव फैसलसाठी खास होता. त्याने या अनुभवाला ‘आयुष्यात एकदाच मिळणारा अनुभव’ असं म्हटलं आहे. चित्रपटातील अनेक दृश्यांचं शूटिंग स्वतंत्रपणे करण्यात आलं असलं तरी दुसऱ्या भागात यशसोबत त्याचे काही महत्त्वाचे प्रसंग आहेत. या चित्रपटाची भव्यता समजून घेण्यासाठी टीमने ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’ आणि ‘अवतार’ यांसारख्या चित्रपटांच्या मेकिंग व्हिडीओंचाही अभ्यास केला होता.

एण्ट्रीच्या सीनवर लाखो व्ह्यूज!

फैसलच्या कुंभकर्णाच्या एण्ट्रीचा सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते त्याला रील्समध्ये टॅग करत असून या दृश्याला लाखो व्ह्यूज मिळत आहेत. ‘पंचायत’मधील प्रल्हाद चाचांच्या भूमिकेसाठीही त्याला प्रचंड प्रेम मिळालं होतं. आता कुंभकर्णाच्या भूमिकेमुळे त्याच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!